टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा ऑलिम्पियन नीरज चोप्रा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात स्पर्धा चालू आहे. ही स्पर्धा खेळाच्या मैदानावर नसून जाहिरातीच्या मैदानात सुरू आहे.
नीरजने टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भालाफेक स्पर्धेत ८७.५९ मीटरवर भाला फेकला आणि भारतासाठी एथलेटिक्समधील पहिले पदक मिळवले. या ऐतिहासिक पदकानंतर नीरज चोप्रावर बक्षीसांचा पाऊस पडला होता. त्यानंतर तो आता जाहिरात क्षेत्रातही सर्वांची पहिली पसंती बनला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मान्यता शुल्कात एक हजार पटीने वाढ झाली आहे. जाहिरात क्षेत्रात विराट एकमात्र असा खेळाडू आहे, ज्याचे शुल्क नीरजपेक्षा जास्त आहे.
१० पटीने जास्त शुल्कासह डीलवर सुरू आहे चर्चा
माध्यमांतील वृत्तांनुसार, टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याआधी नीरज वार्षिक १५ ते १५ लाख रुपये जाहिरातींमधून कमावत होता. तो आता त्याच्या १० पटीने जास्त रकमेच्या डीलवर चर्चा करत आहे. त्याच्या तुलनेत फक्त कोहलीच असा खेळाडू आहे, जो १ ते ५ कोटी रुपयांचे शुल्क घेत आहे. आता शुल्कात झालेल्या वाढीमुळे नीरजही कोहलीच्या जवळ गेला आहे. त्याची फी कोहलीपेक्षा थोडी कमी आहे.
रोहित शर्मा आणि केएल राहुलला टाकले मागे
नीरजने जाहिरात शुल्काच्या बाबतीत रोहित शर्मा आणि केएल राहुलला मागे टाकले आहे. हो दोघेही जाहीरातीसाठी वार्षिक ५० लाख ते १ कोटी रुपये शुल्क घेतात. इकोनाॅमिक्स टाइम्सच्या माहितीप्रमाणे, नीरजची व्यवस्थापन पाहणारी कंपनी लग्जरी ऑटो आणि कपड्यांच्या ब्रँडसोबत ५ किंवा ६ डीलबाबत चर्चा करत आहे. ही डील पुढच्या आठवड्यापर्यंत होईल. नीरजचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्ताक घोष यांनी इकोनाॅमिक्स टाइम्सला सांगितले की, ही डील अनेक वर्षांसाठी आहे, जी पॅरिस ऑलिम्पिक्सपर्यंत चालेल.
महत्त्वाच्या बातम्या-
टोकियो पॅरालिम्पिकची सांगता! भारताने १९ पदकांसह रचला इतिहास, पदकतालिकेत देशाला मिळाला ‘हा’ क्रमांक
टोकियोत भारतीय नेमबाजांनी दाखवला ‘सोनेरी दिवस’, मनीषने ‘सुवर्ण’, तर सिंहराजने ‘रौप्य’ पदकाची कमाई