ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्याने निवड समितीवर टीका होत होत्या. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मात्र यातून काही प्रतिभावंत खेळाडू निवडले आहेत. यात त्याने सूर्यकुमार यादवचीही निवड केली आहे.
सूर्यकुमार यादवने राष्ट्रीय स्तरावर तसेच आयपीएलमध्ये अविश्वसनीय कामगिरी सातत्याने केली आहे. तरी देखील निवड समितीने त्याच्या निवडीबाबत विचार केला नाही. तो गेली तीन वर्षांपासून मुंबई संघासाठी धावा करत आहे. त्याने 2018 साली 512, 2019 साली 424 तर चालू 2020 च्या हंगामात 461 धावा केल्या असून मुंबईचे आणखी सामने बाकी आहेत. निवड समितीने त्याच्यावर अविश्वास दाखवल्याने त्याने देखील अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्याच्या फलंदाजीची प्रशंसा करीत म्हटले की, त्याचीही वेळ येईल. गांगुली म्हणाला, “सूर्यकुमार एक चांगला खेळाडू आहे. त्याचीही वेळ येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचे नाव गेले नसले तरी तो एक उत्तम खेळ करणारा खेळाडू आहे. त्याने मुंबईसाठी खेळताना मारलेले फटकार पाहून मी प्रभावित झालो आहे.”
युवा खेळाडूंकडून गांगुली झाला प्रभावित
सूर्यकुमार यादव हा एकमात्र खेळाडू नसून आणखी काही युवा खेळाडूंनी सौरव गांगुलीला प्रभावित केले आहे. त्यातील काही खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणार आहेत. आयपीएल 2020 मध्ये प्रभावशाली खेळ केल्यानंतर गांगुलीने काही खेळाडू निवडले आहेत. गांगुलीने राजस्थानचा संजू सॅमसन, कोलकाताचा राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शुबमन गिल, बेंगलोरचा देवदत्त पड्डिकल यांना निवडले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सॅमसन आणि चक्रवर्तीला टी-20 संघात स्थान दिले आहे, तर गिलला वनडे व कसोटी सामन्यात समाविष्ट केले आहे. पड्डिकल आणि त्रिपाठी यांना अजून मेहनत घेऊन संघाचा अंतिम कॉल येण्याची वाट पाहावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-जिगरी दोस्त केएल राहुलची ऑरेंज कॅप वाचविणे किंग कोहलीच्या हातात
-आयपीएलमध्ये व्यस्त असताना दुबईतच दोन शिलेदारांनी सुरू केला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सराव
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया