आजपासून(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तीन टी20 सामने होणार आहे. या मालिकेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला खास विक्रम करण्याची करण्याची संधी आहे.
या मालिकेत रोहितने 4 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर त्याला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनण्याची संधी आहे.
रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 94 सामन्यात 102 षटकार मारले आहेत. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 58 सामन्यात 105 षटकार मारले आहेत. तसेच या यादीत दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गप्टील आहे. गप्टीलने 76 सामन्यात 103 षटकार मारले आहेत.
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये गेल, गप्टिल आणि रोहित या तिघांनाच 100 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारता आले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
105 – ख्रिस गेल (58 सामने)
103 – मार्टीन गप्टील (76 सामने)
102 – रोहित शर्मा (94 सामने)
92 – कॉलीन मुनरो (52 सामने)
91 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–सौरव गांगुली म्हणतो, एक दिवस टीम इंडियाचा कोच नक्की बनेल पण…
–आज भारत-विंडीजमध्ये होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…
–भारताविरुद्ध पहिला टी२० सामना खेळण्याआधी विंडीजला मोठा धक्का!






