---Advertisement---

ऑलिम्पिक कांस्यविजेत्या माजी कर्णधाराला संघातून डच्चू! दुर्लक्षित केल्याचे कारण आले समोर, मोठ्या विक्रमाची संधी…

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 11:44 AM
---Advertisement---

प्रो हॉकी लीगसाठी भारतीय हॉकी पुरूष संघ जाहीर झाला आहे. या ३३ सदस्यांच्या संघातून भारतीय हॉकी पुरूष संघाचा माजी कर्णधार मनप्रीत सिंगला वगळले आहे. त्याचबरोबर दिलप्रीत सिंग आणि गोलकीपर कृष्णा पाठक यांनाही दुर्लक्षित केले आहे. ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षानंतर पदक जिंकण्याची कामगिरी भारताने मनप्रीतच्याच नेतृत्वात केली होती. त्याने भारताच्या २०२०च्या कांस्यपदक विजेत्या टोकियो ऑलिम्पिक संघाचे कर्णधारपद भुषविले होेते. यामुळे त्याला संघात का घेतले नाही, या चर्चा सुरू झाल्या.

मनप्रीतनेच त्याला संघातून वगळण्यामागचे कारण सोशल मीडियाच्या पोस्टमधून स्पष्ट केले आहे. यामध्ये त्याने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत पॅरिस ऑलिम्पिकपासून संघाचे वेळापत्रक खूपच व्यस्त राहिले. त्यातून ब्रेक हवा हे कारण त्याने सांगितले आहे. तसेच त्याला संघात न घेण्यामागे कारण त्याने सांगितले असले तरी विविध चर्चांना ऊत आला आहे.

भारताने ७ ते १० डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट आणि एक सराव सामना खेळला. यामध्ये भारताच्या मनप्रीतबरोबर दिलप्रीत आणि पाठक या तिन्ही खेळाडूंनी नियम मोडले होते, त्याचीच शिक्षा म्हणून त्यांना वगळले असल्याचा अंदाज लावला जात आहे.

तसेच मनप्रीतला मोठा विक्रम करण्यापासून रोखण्यासाठी केले असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम दिलीप टिर्की यांच्या नावावर आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४१२ सामने खेळले असून मनप्रीतने भारतासाठी आतापर्यंत ४११ सामने खेळले आहे. तसेच टिर्की हे हॉकी इंडियाचे अध्यक्ष आहेत. यामुळे या माहितीला वेगळेच वळण आले आहे.

संघाचे प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांनी मात्र वर्कलोड मॅनेज करण्यासाठी संघात बदल केले असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले, हीरो हॉकी इंडिया लीगनंतर आम्हाला संघात बदल करावासा वाटला. व्यस्त वेळापत्रक असल्याने त्याचे नीट नियोजन होण्यासाठी काही खेळाडूंना आराम दिला आहे. तसेच रौरकेला आणि होबार्ट प्रो लीगही असल्याने ज्यांची कामगिरी उत्तम राहिली, अशांना संधी देण्याचा प्रयत्न केला. विश्वचषक आणि एशियन गेम्स जवळ आल्याने त्याचाही विचार करण्यात आला.

भारतीय खेळाडू रौरकेलामध्ये आयोजित शिबीराच भाग घेणार आहेत. हे शिबीर १ ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. प्रो हॉकी लीग १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये खेळली जाणार आहेत. त्यानंतर २१ ते २५ फेब्रुवारीच्या काळात होबार्टमध्ये सामने खेळले जाणार असून युरोपियल लीग जूनमध्ये सुरू होणार आहे.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---