भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये तीन टी -२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा टी -२० सामना मंगळवारी (२८ जुलै) खेळला जाणार होता. परंतु, हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे हा सामना एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता.
तसेच कृणाल पंड्याचा अहवाल पॉसिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. परंतु अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, कडक बायो बबल असताना देखील त्याला कोरोनाची लागण झालीच कशी? चला तर जाणून घेऊया यामागील मुख्य कारण.
असे म्हटले जात आहे की, मंगळवारी (२७ जुलै) त्याचा घसा खवखवत झाली होता. ज्यानंतर भारतीय मेडिकल स्टाफने त्याला रॅपिड एंटीजन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला होता. जो पॉसिटीव्ह आला होता. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी केली गेली होती, ती देखील पॉसिटीव्ह आली होती. परंतु हा प्रश्न हा उपस्थित झाला आहे की, बायोबबलचे वातावरण अती सुरक्षित असते, त्यांना इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ दिले जात नाही.(How did krunal Pandya become positive in a very safe bio bubble what happened to him that he got affected)
हे असू शकते कारण
कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्याचे मुख्य कारण आता समोर येत आहे. सध्या भारतीय संघ कोलंबोच्या ताज समुद्र हॉटेलमध्ये आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, त्याला कोरोनाची लागण इथेच झाली आहे. हे लॉजिस्टिक्स स्टाफ, बस चालक किंवा कॅटरिंग स्टाफमधील सदस्यांमुळे पसरले असल्याचे म्हटले जात आहे.
संपर्कात आलेल्या या ८ खेळाडूंच्या चिंतेत होऊ शकते वाढ
स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, जे ८ खेळाडू कृणाल पंड्याच्या संपर्कात आले आहेत, ते खेळाडू म्हणजे युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन, पृथ्वी शॉ, कृष्णप्पा गौतम आणि मनीष पांडे. जर हे ८ मुख्य खेळाडू श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात खेळले नाही तर,भारतीय संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. या दौऱ्यावर बीसीसीआयने २० खेळाडूंचा संघ रवाना केला होता. यामध्ये ४ नेट गोलंदाजांचा ही समावेश आहे. हे खेळाडू खेळणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! दिग्गज गॅरी सोबर्स यांनी चक्क दारुच्या नशेत लॉर्ड्सवर झळकावले होते शतक, वाचा तो किस्सा
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत साई प्रणीत नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभूत; दाखवला बाहेरचा रस्ता
“तर बुमराहची कारकिर्द संपुष्टात यायला वेळ लागणार नाही”, दिग्गजाचा टीम इंडियाला इशारा