आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघ आणि रोहित शर्मा व हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद केंद्रस्थानी होते. मुंबई फ्रँचायझीने अचानक रोहितला कर्णधारपदावरुन हटवून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिकच्या खांद्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या अनेक बातम्या आयपीएलदरम्यान आल्या होत्या. मात्र, 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही स्टार खेळाडूंनी एकत्र येऊन भारताला विश्वविजेता बनवले होते. दोघांमधील मतभेद कसे मिटले? हे अजूनही एक गूढच आहे. मात्र, आता हे रहस्य उलगडले आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या आपापसातील मतभेद विसरून कसे एकत्र आले? आणि त्यांनी देशासाठी टी20 विश्वचषक जिंकला, याबद्दल सांगितले आहे. भारताच्या पहिल्या सराव सत्रात विमल कुमार अमेरिकेत उपस्थित होते. ते म्हणाले की, दोन्ही खेळाडूंनी दीर्घ चर्चेद्वारे मतभेद सोडवले.
‘टू स्लगर्स पॉडकास्ट’वर विमल कुमार म्हणाले, “जेव्हा मी नेटवर गेलो तेव्हा मी पाहिले की हार्दिक आणि रोहित संवाद साधत नव्हते. पहिल्या दिवशी ते बोलत नव्हते आणि एकमेकांपासून दूर होते, पण दुसऱ्या दिवशी मी पाहिले की ते एक एक करून आले आणि एका कोपऱ्यात एकत्र बसून बराच वेळ बोलत होते. माझ्यासाठी तो क्षण या संघाची व्याख्या ठरला. तेथे कॅमेरे नव्हते; काहीही नव्हते. रोहित आणि हार्दिक बोलत असताना मला वाटलं, ‘मी काय पाहतोय?'”
दोघांनी एकत्र सराव केला
ते पुढे म्हणाले, “भारतात बरेच काही चालले आहे, लोक त्यांच्या मतभेदांबद्दल बोलत आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवस रोहित आणि हार्दिकने एकत्र फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला. जेव्हा मी ते वातावरण पाहिले आणि संघाचे वातावरण किती आरामदायक होते हे दिसून आले आणि शेवटी काय झाले ते संपूर्ण जगाने पाहिले.”
हेही वाचा –
शतक झळकावत जो रुटने केली ॲलिस्टर कुकची बरोबरी, आता गावसकरांच्या विक्रमावर नजर
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड