भारताचा माजी दिग्गज गोलंदाज झहीर खान आयपीएल 2025 साठी लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर बनला आहे. फ्रॅन्चाईजनं काल (28 ऑगस्ट) एका पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत झहीर खान आणि लखनऊचे मालक संजीव गोयंका देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना गोयंका यांनी सांगितलं की, झहीर खान कशाप्रकारे लखनऊ संघाचा मेंटॉर बनण्यासाठी तयार झाला. त्यांनी मोठा खुलासा करत सांगितलं की, झहीर खान फक्त एका फोन कॉलवर तयार झाला.
झहीर खानबद्दल बोलायचं झालं तर त्यानं यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये काम केलं आहे. मात्र त्यानं गेल्या काही काळापासून कोणतीही जबाददारी सांभाळली नव्हती. आता त्यानं लखनऊच्या मेंटॉरची भूमिका स्वीकारली आहे. झहीर लखनऊचा मार्गदर्शक बनण्याची कहानी खूप रंजक आहे.
संजीव गोयंका एका मुलाखतीत म्हणाले, “झहीर खान आणि माझ्यात बोलणं झालं आणि लगेच निर्णय घेतला गेला. आम्ही एका ठिकाणी भेटलो आणि निर्णय घेतला की यावर बोलू. यानंतर आमच्यात फोन कॉल झाला आणि आम्ही सगळ ठरवलं. सगळं खूपच सोपं होतं.”
झहीर खाननं बोलताना लखनऊ संघाची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला की, ही अशी टीम आहे, जिचं कल्चर खूप चांगलं आहे. त्यामुळे त्यानं या संघासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी आयपीएल 2022 आणि 2023 हंगामात गौतम गंभीर लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर होता. आयपीएल 2024 पूर्वी तो केकेआरमध्ये सामिल झाला होता. त्यानंतर आता लखनऊनं या पदावर झहीरची नियुक्ती केली आहे.
हेही वाचा –
‘खूप वाईट परिस्थिती…’, भारतीय क्रिकेटपटूचे कुटुंब पुरात अडकले, एनडीआरएफ टीम मदतीला!
भारताचं दुर्दैवचं! त्रिशतक झळकावूनही संघाबाहेर; स्टार खेळाडूचे करिअरबद्दल मोठं वक्तव्य
रवी अश्विनने निवडले ऑलटाईम आयपीएल प्लेइंग इलेव्हन, क्रिकेटमधील देवालाच बाहेर!