---Advertisement---

‘या’ कारणामुळे विराटने शाहबाज अहमदकडे १७ वी ओव्हर टाकण्यासाठी सोपवला चेंडू

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 11:50 PM
Shahbaz Ahmed,Virat Kohli,
---Advertisement---

चेन्नई। बुधवारी (१४ एप्रिल) इंडियन प्रमीयर लीग २०२१ हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ६ धावांनी विजय मिळवला. हा त्यांच्या या हंगामातील सलग दुसरा विजय ठरला. बेंगलोरच्या बुधवारच्या विजयात शाहबाज अहमदचे मोठे योगदान राहिले.

या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने चांगली सुरुवात केली होती. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५४ धावांची खेळी करत संघाला सुस्थितीत आणले होते. मात्र, त्याची विकेट १४ व्या षटकात पडली. त्यानंतर १७ व्या षटकात हैदराबादला तब्बल ३ धक्के बसले. शाहबाज अहमदने टाकलेल्या या षटकात हैदराबादचे जॉनी बेअरस्टो(१२), मनिष पांडे(३८) आणि अब्दुल समद(०) हे तिघेही फलंदाज बाद झाले. त्यामुळे हे षटक सामन्याला वळण देणारे ठरले.

पुढे हर्षल आणि सिराजने हैदराबादला विजयापर्यंत पोहचू न देण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे बेंगलोरने हा सामना ६ धावांनी जिंकला.

या सामन्यानंतर जेव्हा शाहबाजला त्याच्या गोलंदाजीबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘त्यावेळी (१७ व्या षटकात) दबावाची परिस्थिती होती. पण मी आनंदी आहे की त्यावेळी कर्णधाराने माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. मला कर्णधाराने १७ वे षटक यासाठी दिली की खेळपट्टीकडून मदत मिळत होती आणि मी त्याचा फायदा घेतला. माझ्याकडे आणखी एक षटक टाकण्याइतपत आत्मविश्वास होता. पण सिराज चांगली गोलंदाजी करत होता आणि तो अखरेच्या षटकांसाठी ते पात्र होता.’

शाहबाजने या सामन्यात २ षटके गोलंदाजी केली. तसेच ७ धावा देत एकूण ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त बेंगलोरकडून मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर काईल जेमीसनने १ विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० षटकामध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार खेळी करत ५९ धावा केल्या. मात्र संघातील इतर सहकाऱ्यांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅक्सवेलनंतर कर्णधार विराटने सर्वाधिक ३३ धावा केल्या. हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

बेंगलोरचा पुढील सामना १८ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नईमध्येच दुपारी होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल.

महत्त्वाच्या बातम्या –

SRHvsRCB : बेंगलोरच्या गोलंदाजांच्या अखेरच्या क्षणी टिच्चून मारा; हैदराबादवर ६ धावांनी मिळवला विजय

राशिदचा ‘तो’ अप्रतिम झेल पाहिला का? व्हिडिओ होतोय व्हायरल

लय भारी! सुर्यकुमारने विचारलेल्या प्रश्नावर ट्रेंट बोल्टचे हिंदीत उत्तर, पाहा व्हिजिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---