मुंबई। आयओसीच्या सदस्या, श्रीमती नीता अंबानी यांनी सोमवारी ओडिशा येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुरू केलेल्या भारताच्या पहिल्या ‘ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रमा’ (OVEP) चे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी ऑलिम्पिझमची मूलभूत मूल्ये रुजवण्यासाठी या कार्यक्रमाच्या (OVEP) शिक्षण आणि क्रीडा या दुहेरी शक्तींना एकत्र करत असण्यावर भर दिला. हा कार्यक्रम (OVEP) हा IOC द्वारे तरुणांना उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या ऑलिम्पिक मूल्यांची ओळख करून देण्यासाठी तयार केलेला एक व्यावहारिक संच आहे. मुलांना सक्रिय, निरोगी आणि जबाबदार नागरिक बनण्यास मदत करण्यासाठी या मूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा प्रसार करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. भारताच्या ऑलिम्पिक चळवळीतील एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या या उपक्रमाचे (OVEP) प्रक्षेपण प्रतिष्ठित अशा IOC २०२३ सत्राची सुरुवात करण्यात आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, श्रीमती अंबानी यांनी २०२३ मधील आयओसी सत्राचे आयोजन करण्याच्या भारताच्या बोलीसाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. या अंतर्गत भारताला ४० वर्षांच्या अंतरानंतर सर्वानुमते अधिकार प्रदान करण्यात आले होते. भारतातील आयओसी सत्र हे भारतीय क्रीडा इतिहासातील एक नवीन युग दर्शविते. यामुळे देशातील क्रीडा परिसंस्थेसह भारताच्या अंतिम ऑलिम्पिक आकांक्षांना चालना मिळेल. तसेच यामुळे तरुणांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी आणि जागतिक गौरव मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. श्रीमती अंबानी या बहुविध ऑलिम्पिक चळवळीचा भाग आहेत आणि OVEP- जे ऑलिम्पिक शिक्षणाच्या अंतर्गत येते – ते विशेषतः त्यांच्या हृदयानजीक आहे. कारण ते मुलांमध्ये मुख्य ऑलिम्पिक मूल्ये रुजविण्यात साहाय्य करते.
कार्यक्रमाच्या शुभारंभाबद्दल आनंद व्यक्त करताना, IOC सदस्या श्रीमती नीता अंबानी म्हणाल्या, “आमच्या शाळांमध्ये २५० दशलक्षाहून अधिक मुले आहेत. आणि त्यांच्यामध्ये प्रतिभा आणि क्षमता आहे. ते उद्याचे चॅम्पियन आहेत. तसेच आपल्या देशाचे ते भविष्य आहे. जगातील केवळ काही मुलेच ऑलिम्पियन बनू शकतात. परंतु प्रत्येक मुलाला ऑलिम्पिक चळवळीच्या सामर्थ्याने स्पर्शित केले जाऊ शकते. आणि हेच ओवीईपीचे मुख्य ध्येय आहे. आणि त्यामुळेच भारतासाठी ही एक मोठी संधी आहे. पुढील वर्षी मुंबईत आयओसी सत्र २०२३ चे आयोजन करण्याची तयारी करत असताना, मी आपल्या देशातील ऑलिम्पिक चळवळ आणखी मजबूत करण्यासाठी आशादायी आहे.”
ओडिशाचे मा. मुख्यमंत्री नवीन पटनायक, IOC सदस्या श्रीमती नीता अंबानी, IOC शिक्षण आयोगाच्या अध्यक्षा मिकाएला कोजुआंगको जवॉर्स्की, ऑलिम्पियन आणि IOC ऍथलीट्स कमिशनचे सदस्य अभिनव बिंद्रा आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (IOA) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या हस्ते OVEP अधिकृतपणे सादर करण्यात आले. OVEP चा ओडिशाच्या शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश केला जाईल. हा कार्यक्रम शालेय आणि जनशिक्षण विभाग, ओडिशा सरकार आणि अभिनव बिंद्रा फाउंडेशन ट्रस्ट यांच्या भागीदारीत विकसित केला जात आहे.
श्रीमती अंबानी यांनी ओडिशा सरकारचे भारताचे ऑलिम्पिक स्वप्न आणि तळागाळातील विकासासाठी सतत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. त्या म्हणाल्या, “श्री पटनायकजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली वाढीव गुंतवणूक आणि समर्पित प्रयत्नांमुळे ओडिशा हे भारताच्या क्रीडा महत्त्वाकांक्षेचे केंद्र बनले आहे. हे राज्य सक्रियपणे खेळासाठी सर्वांगीण परिसंस्था तयार करत आहे, जे आमच्या तरुण खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा पुरवते.”
उल्लेखनीय म्हणजे, रिलायन्स फाउंडेशन ओडिशा रिलायन्स फाउंडेशन ऍथलेटिक्स हाय-परफॉर्मन्स सेंटर (HPC) साठी ओडिशा सरकारसोबत कार्य करत आहे. HPC मधील रिलायन्स फाऊंडेशन ऍथलीट – ज्योती याराजी आणि अमलन बोरगोहेन या दोहोंनी गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय असे राष्ट्रीय विक्रम मोडले आणि अनेक पदके मिळविली. ज्योती ही अभूतपूर्व कामगिरी करत आहे. तिने सुरुवातीला १९ वर्षांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला आणि नंतरच्या स्पर्धेत तिचा स्वतःचा विक्रम आणखी उंचावला. या पराक्रमासह, ज्योतीने भारतीय खेळांचे भविष्य सुरक्षित हातात असल्याचे अधोरेखित करून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी AFI पात्रता कालावधी मिळविला आहे.
OVEP-Odisha कार्यक्रमाविषयी
OVEP-आधारित प्रकल्प आणि उपक्रम गतिहीन जीवनशैली, एकाग्रतेचा अभाव आणि किशोरवयीन मुलांनी शाळा सोडणे या जागतिक आव्हानांना तोंड देण्यास मदत करतात. संसाधने आणि टूलकिट तरुणांना शारीरिक क्रियाकलापांचा आनंद घेणे आणि शिकणे आणि आजीवन सामाजिक, संज्ञानात्मक आणि शारीरिक कौशल्ये प्राप्त करणे शक्य करण्यासाठी आरेखित केले आहे. पहिल्या वर्षात, कार्यक्रमाचे उद्दिष्ट भुवनेश्वर आणि राउरकेला शहरांमधील ९० शाळांमध्ये नोंदणी केलेल्या ३२,००० मुलांवर सकारात्मक परिणाम करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण जोमाने सुमारे ७ दशलक्ष मुलांपर्यंत पोहोचेल. ओडिशा राज्याचा आपल्या सर्व शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने OVEP नेण्याचा मानस आहे. यामुळे तेथील तरुण लोकसंख्येला ऑलिम्पिक मूल्ये खऱ्या अर्थाने स्वीकारता येतील.
ऑलिम्पिक फाउंडेशन फॉर कल्चर अँड हेरिटेज (olympics.com) हे IOC साठी OVEP कार्यक्रमाचे नेतृत्व करते. ABFT च्या प्रशिक्षकांसह, ओडिशा राज्याद्वारे नामनिर्देशित “मास्टर ट्रेनर्स”साठी प्रशिक्षण सत्र आयोजित करेल. ज्या बदल्यात राज्यातील आठ ते दहा शाळांच्या फोकस ग्रुपसह कार्यक्रम सुरू करता येईल. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण आणि क्रीडा अधिकारी आणि प्रकल्पात सहभागी असलेल्या इतर मुख्य गट सदस्यांसाठी ओरिएंटेशन सत्र आयोजित केले जातील.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या निखत झरीनला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
शॉकिंग! लाईव्ह सामन्यातच ३८ वर्षीय स्टार बॉक्सरला हृदयविकाराचा झटका, जागीच गमावले प्राण
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, सी गेम्सच्या तांत्रिक समितीत चेतन पाठारे आणि विक्रम रोठे