भारतीय संघाचा स्टार गोलंदाज हरभजन सिंग याने शुक्रवारी (२४ डिसेंबर) क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. तब्बल २३ वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अखेर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केले आहे. आपल्या कारकीर्दीत त्याने क्रिकेटच्या मैदानावर अनेक मोठमोठे विक्रम केले. आता निवृत्त झाल्यानंतर अनेकांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, तो राजकारणाकडे वळेल. अशातच स्वतः हरभजन सिंगने याबाबत खुलासा केला आहे.
प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या संपूर्ण कारकिर्दीत देशासाठी आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु एक वेळ येते जेव्हा त्याला निरोप घ्यावा लागतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होते. आता हरभजन सिंगची देखील दुसरी इनिंग सुरू झाली आहे. अशातच तो राजकारणात प्रवेश करणार की आणखी काही? याबाबत त्याने खुलासा करत म्हटले आहे की, “मी अजून कोणताही निर्णय घेतला नाहीये.”(harbhajan singh statement)
हरभजन सिंगने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो भविष्यात काय करणार असे विचारण्यात आले होते. ज्याचे उत्तर देत तो म्हणाला की, “खरं सांगू तर, मला नाही माहित पुढे काय होणार आहे. मला पुढे काय करायचं आहे. याचा विचार करण्यासाठी कमीत कमी २-३ दिवसाचा वेळ लागेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर मी राजकारणात गेलो तर, कसे आणि कशाप्रकारे मी लोकांना मदत करू शकतो याचा मला विचार करावा लागेल. जर मी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला तरच…” या गोष्टीची शक्यता खूप कमी आहे की तो निवडणूक लढवणार. कारण तो अनेकदा समालोचन करताना दिसून आला आहे. त्यावेळी तो समालोचन क्षेत्राकडे देखील वळू शकतो. परंतु काही दिवसांपूर्वी त्याने पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरून तो राजकारणात प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त केला गेला होता.
महत्वाच्या बातम्या :
हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’
हे नक्की पाहा: