भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याच्या क्रिकेट कारकिर्दितील सध्या सर्वात वाईट काळ सुरू आहे. त्याला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थान देखील गमवावे लागले होते. त्यानंतर त्याला पुनरागमन करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली नाही.
मागील इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी आणि वनडे मालिकेत त्याला प्रत्येकी एक-एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु त्याला आपली छाप सोडता आली नाही. त्यानंतर त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. अशातच कुलदीप यादवने संघात पुनरागमन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
इंडिया न्यूजसोबत बोलताना कुलदीप यादव म्हणाला, “मी आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात नसल्याचे मला खूप दुःख होत आहे. कारण मलाही चांगली कामगिरी करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान द्यायचे आहे. अशा गोष्टी होत असतात. परंतु तुम्हाला येणाऱ्या संधीसाठी तयार राहायला लागते. मला इंग्लंड दौऱ्यावर निवडले गेले नाही. परंतु मला आशा आहे की, मला श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. प्रत्येक खेळाडू दुःखी होतो, जेव्हा त्याला संघात स्थान मिळत नसते. प्रत्येक खेळाडूला संघात खेळायचे असते. परंतु कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते, जेव्हा तुम्हाला संघात सहभागी होता येत नाही.”
यावर्षीच्या सुरुवातीला भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ३-१ ने धूव्वा उडवला होता. या मालिकेत कुलदीप यादवला देखील स्थान देण्यात आले होते. परंतु संपूर्ण सामन्यात कुलदीप यादवला अवघे १२ षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याला २ गडी बाद करण्यात यश आले होते.
तसेच टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने शेवटचा टी-२० सामना गतवर्षी श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता. तसेच त्याने वनडे सामना इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत खेळला होता. यासोबतच इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतही त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नव्हती.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात ‘या’मुळे विराट-रोहित येणार अडचणीत; दिग्गजाचे भाष्य
‘WTC फायनलमध्ये अश्विन-जडेजाला एकत्र खेळवा,’ ३५ कसोटीत ८८ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा सल्ला