आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तारखांची घोषणा केली आहे. यासोबतच अमेरिका व वेस्ट इंडीज या दोन्ही सहयजमान देशातील तब्बल दहा शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. स्पर्धेची सुरुवात 4 जून रोजी होऊन अंतिम सामना 20 जून रोजी पार पडेल.
All the venues for the ICC Men's #T20WorldCup 2024 have been locked in 🔒
More 👇
— ICC (@ICC) September 22, 2023
शुक्रवारी (22 सप्टेंबर) आयसीसीने आपल्या बैठकीनंतर या विश्वचषकासाठी तारखांचे तसेच ठिकाणांच्या नावांची घोषणा केली. दोन दिवसापूर्वी आयसीसीने अमेरिकेतील तीन स्थळांची घोषणा केली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिजमधील सात शहरांची नावे जाहीर केली गेली आहे. वेस्ट इंडीजमधील अँटिग्वा आणि बार्बुडा, बार्बाडोस, डोमिनिका, गयाना, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स या ठिकाणी या शहरांमध्ये विश्वचषक खेळला जाईल. तर, अमेरिकेतील अमेरिकेतील सामने आता फ्लोरिडा, न्यूयॉर्क व डेल्लास येथे खेळले जातील. डॅलसमधील ग्रँड प्रेरी, फ्लोरिडामधील ब्रॉवर्ड काउंटी आणि न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी ही मैदाने या विश्वचषकासाठी निवडली गेली आहेत.
वेस्ट इंडीजला तिसऱ्यांदा आयसीसीच्या मोठ्या विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी त्यांनी 2007 वनडे विश्वचषक व 2010 टी20 विश्वचषक आयोजित केला होता. दुसरीकडे, अमेरिकेत सध्या क्रिकेटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग ही स्पर्धा खेळली गेली. यामध्ये जगभरातील अनेक मोठ्या क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदवला. त्यासोबतच विविध देशातील क्रिकेटपटू अमेरिकेत खेळण्यास प्राधान्य देत आहेत.
(ICC Announced Dates And Cities For ICC 2024 T20 World Cup)
महत्वाच्या बातम्या –
U19 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ देशात भरणार भविष्यातील सिताऱ्यांचा मेळा
भेदक गोलंदाजीपुढे काँगारूंनी टेकले गुडघे! भारतासाठी मोहम्मद शमी एकटाच चमकला