आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी ऐतिहासिक स्पर्धा आहे, जी आतापर्यंत 6 वेगवेगळ्या देशांनी जिंकली आहे. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेवटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जवळपास 3 महिने शिल्लक असून अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नाही. आता एका मीडिया रिपोर्ट समोर आला आहे की, आयसीसी या आठवड्याच्या शेवटी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
आयएएनएसच्या सूत्रांनी सांगितले की, आयसीसी या आठवड्याच्या अखेरीस वेळापत्रक जाहीर करू शकते. भारतीय संघाच्या विषयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन रझा नक्वी यांनी एका नव्या वक्तव्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला असून भारताला काही अडचण असल्यास पाकिस्तान बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असे म्हटले आहे.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलचा विषयही खूप चर्चेत आला आहे, पण हे हायब्रीड मॉडेल म्हणजे काय? खरे तर 2023च्या आशिया चषकादरम्यानही भारतीय संघाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता, अशा परिस्थितीत पीसीबीला हायब्रीड मॉडेल स्वीकारणे भाग पडले होते, ज्या अंतर्गत पाकिस्तानविरूद्ध श्रीलंकेत इतर सर्व संघांचे सामने आयोजित करण्यात आले होते.
परंतु पीसीबीने आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे की, यावेळी ते कोणत्याही परिस्थितीत हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत या आठवड्याच्या अखेरीस आयसीसी काय निर्णय घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत बाहेर होणार का? चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावले जाणार आहे का? वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अशा अनेक प्रश्नांची उत्तरे समोर येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; विराट कोहली धावांचा भुकेला आहे, माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
बाबर आझमने मोडला विराटचा रेकाॅर्ड! आता नंबर रोहितचा
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीत सर्वोच्च धावसंख्या करणारे खेळाडू (टाॅप-5)