---Advertisement---

टीम इंडियासाठी सोनियाचा दिवस, तब्बल ४ भारतीय खेळाडूंना मिळाले आयसीसी २०१८च्या वन-डे संघात स्थान

On: मंगळवार, जानेवारी 22, 2019 5:11 PM
---Advertisement---

आयसीसीने आज (22 जानेवारी) 2018ची सर्वोत्कृष्ठ वन-डे संघातील खेळाडूंची नावे जाहिर केली आहेत. 2018मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची वन-डेमध्ये केलेली कामगिरी बघता त्यांना या संघात स्थान देण्यात आले आहे.

यामध्ये वन-डे क्रमवारीत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या इंग्लंड आणि भारत या संघातील प्रत्येकी चार खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे हा आयसीसीच्या सर्वोत्कृ्ष्ठ कसोटी संघाबरोबरच वन-डे संघाचेही कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

त्याचबरोबर भारताचा स्फोटक सलामीवीर रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि चायनामन गोलंदाज कुलदिप यादव यांनाही या आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट वनडे संघात स्थान मिळाले आहे.

इंग्लंडच्या जो रूट, बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो आणि जॉस बटलर या चार खेळाडूंना आयसीसी सर्वोत्कृष्ठ वन-डे संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे न्यूझीलंडचा रॉस टेलर, बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान आणि अफगानिस्तानचा राशिद खान हे तिघेही आयसीसीच्या सर्वोत्कृ्ष्ठ अंतिम अकरा जणांच्या वन-डे संघात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार

विराट कर्णधार असलेला आयसीसी २०१८चा सर्वोत्कृष्ठ कसोटी संघ जाहीर, भारताच्या तीन खेळाडूंचा सहभाग

२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment