---Advertisement---

आयसीसी २०१९च्या सर्वोत्तम वनडे संघात भारतीयांचा बोलबाला!

On: बुधवार, जानेवारी 15, 2020 1:27 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (15 जानेवारी) 2019 या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट वनडे संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. 2019मध्ये विविध संघाच्या क्रिकेटपटूंची वनडेमध्ये केलेली कामगिरी बघता त्यांना या संघात स्थान देण्यात आले आहे.

आयसीसीच्या 11 जणांच्या या संघात भारताच्या सर्वाधिक 4 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे या सर्वोत्कृष्ट वनडे संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे.

त्याचबरोबर भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव या क्रिकेटपटूंचा या वनडे संघात समावेश आहे.

या वनडे संघात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांचाही समावेश आहे. तर इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. बटलरला यष्टीरक्षक म्हणून या संघात सामील करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा शाय होप, पाकिस्तानचा बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क हे तिघेही आयसीसीच्या सर्वोत्कृष्ट अंतिम 11 जणांच्या वनडे संघात आहेत.

असा आहे आयसीसीचा 2019चा सर्वोत्तम वनडे संघ –

रोहित शर्मा, शाय होप, विराट कोहली (कर्णधार), बाबर आजम, केन विलियम्सन, बेन स्टोक्स, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मिशेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---