आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. आधी इंग्लंड आणि नंतर पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर अफगाणिस्तानने आपल्या सहाव्या सामन्यात श्रीलंका संघाचा धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेला विश्वचषकातील 30वा सामना 7 विकेट्सने जिंकला. या विजयानंतर त्यांना विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये जबरदस्त फायदा झाला.
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत घेतलेला गोलंदाजीचा निर्णय पथ्यावर पडला. त्यांनी श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी श्रीलंका संघाने 49.3 षटकात 10 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 45.2 षटकात 3 विकेट्स गमावत 242 धावा केल्या आणि सामना 7 विकेट्सने जिंकला. या विजयानंतर विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबल (World Cup 2023 Points Table) स्थिती बदलून टाकली. त्यांनी 6 गुणांसह पाचवे स्थान पटकावले. त्याचा नेट रनरेट -0.718 आहे.
श्रीलंकेची घसरण, पाकिस्तान आणखी खाली
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंका संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. त्यांना 6 सामन्यात 4 पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे 4 गुण आहेत. तसेच, नेट रनरेटही -0.275 इतका आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान संघही पॉईंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यांचा नेट रनरेट -0.387 इतका आहे. इंग्लंड संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खाली म्हणजे दहाव्या स्थानी आहे. त्यांचे 2 गुण आहेत. तसेच, नेदरलँड्स आणि बांगलादेश संघ अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत.
With three games remaining for each side, who do you see going through to the semi-finals? 🏆#CWC23 pic.twitter.com/9AGJ1Pv8MQ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 31, 2023
भारत अव्वलस्थानी, तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानी
पॉईंट्स टेबलमध्ये सध्या अव्वलस्थानी असलेला संघ म्हणजे भारत होय. भारताने 6 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह हे स्थान काबीज केले आहे. भारताचा नेट रनरेट +1.405 आहे. त्यांनी उपांत्य फेरीतील आपली जागाही जवळपास पक्की केली आहे. तसेच, दक्षिण आफ्रिका संघही 10 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघ 8-8 गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत. न्यूझीलंडचा नेट रनरेट +1.232 आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट +0.970 आहे. (icc odi world cup 2023 points table after afghanistan won against sri lanka by 7 wickets see)
हेही वाचा-
काळीज तोडणारी बातमी! चालू वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या फॅनचे निधन, रोहितशी होते खास कनेक्शन
धक्कादायक! राष्ट्रगीत सुरू असतानाच मेंडिसपुढे उभा असलेला मुलगा झालेला बेशुद्ध, दोन्ही संघांचे खेळाडू हैराण