भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. 2019 नंतर पुन्हा एकदा हे बलाढ्य संघ उपांत्य सामन्यात आमने-सामने आले आहेत. त्या सामन्यातही पावसाने एन्ट्री केली होती. पावसामुळे त्यावेळी सामना राखीव दिवसापर्यंत गेला होता. तसेच, दुसऱ्या दिवशी भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. यावेळीही हेच दोन संघ आमने-सामने असणार आहेत. मात्र, सामन्याच्या दिवशी पाऊस आला, तर काय होईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध न्यूझीलंड
जर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात किंवा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात सतत पाऊस पडला, तर तो सामना राखीव दिवशी पूर्ण केला जाईल. आयसीसी बोर्डाने आपल्या दोन्ही उपांत्य सामन्यांसाठी एक-एक दिवस राखीव ठेवला आहे. अशात भारत आणि न्यूझीलंड संघात होणाऱ्या सामन्यात पाऊस पडला, तर सामना 16 नोव्हेंबरला खेळवला जाईल. तसेच, जर 16 नोव्हेंबरलाही पाऊस थांबला नाही आणि सामना पूर्ण झाला नाही, तर पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी असणाऱ्या संघाला अंतिम सामन्यात जाण्यची संधी मिळेल.
भारत आणि न्यूझीलंड संघांची पॉईंट्स टेबलमधील स्थिती पाहिली, तर भारत 16 गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. मात्र, भारताचा एक सामना नेदरलँड्सविरुद्ध बाकी आहे. जर या सामन्यात भारत जिंकला, तर त्यांचे 18 गुण होतील. तसेच, भारत पराभूत जरी झाला, तरीही भारत अव्वलस्थानीच राहील. तसेच, न्यूझीलंड 10 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे या सामन्याच्या राखीव दिवशी पाऊस पडला, तर भारताला थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात काय होईल?
अशात दुसऱ्या उपांत्य सामन्यातही पावसाने एन्ट्री केली, तर काय होईल, असाही प्रश्न अनेक चाहत्यांना पडू शकतो. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 16 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. त्यादिवशी जर सामना अर्धा झाला किंवा होऊ शकला नाही, तर सामना राखीव दिवशी 17 नोव्हेंबरला पूर्ण केला जाईल. जर राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात पॉईंट्स टेबलमध्ये जो अव्वलस्थानी असेल, त्याला अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल.
तसं पाहिलं, तर दक्षिण आफ्रिकेलाच अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. कारण, संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. दोघांचे 14-14 गुण आहेत, पण दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते दुसऱ्या स्थानी आहेत. अशात पहिल्या आणि दुसऱ्या उपांत्य सामन्यात पावसाने एन्ट्री केली, आणि कोणताही निकाल लागला नाही, तर 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना खेळला जाईल. (icc ODI world cup 2023 what will happen if india vs new zealand semi final match will washed out Know here all)
हेही वाचा-
इंग्लंडकडून हारताच बाबरने कुणालाच नाही सोडलं, वाचून काढला चुकांचा पाढा; म्हणाला, ‘जर आम्ही…’
पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्यानंतर बटलरची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आम्ही त्याच्याशिवाय…’