दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे हे तीन देश एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 चं आयोजन करणार आहेत. ही स्पर्धा 2027 मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात खेळली जाईल.
आता या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेतील त्या 8 मैदानांची घोषणा करण्यात आली आहे, जेथे सामने खेळले जातील. 2023 च्या विश्वचषकाचा उत्साह लक्षात घेता पुढील विश्वचषक अधिक स्फोटक ठरू शकतो. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे आयसीसी विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवण्याची ही केवळ दुसरी वेळ असेल. तर नामिबिया प्रथमच विश्वचषकाचं आयोजन करणार आहे.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, जोहान्सबर्गमधील वांडरर्स स्टेडियम, प्रिटोरियातील सेंच्युरियन पार्क, डर्बनमधील किंग्समीड, सेंट जॉर्ज पार्क, सुपरस्पोर्ट पार्क, न्यूलँड्स स्टेडियम, बफेलो पार्क आणि द मँगाँग ओव्हल या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी सांगितलं की, “हॉटेल रूम आणि विमानतळ सुविधा सुलभ करण्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याकडे आयसीसीनं मंजूर केलेली 11 मैदानं आहेत. त्यामुळे उर्वरित 3 कडे दुर्लक्ष करणं कठीण होतं. मात्र अनेक मुद्द्यांकडे लक्ष ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.”
यजमान असल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे 2027 च्या वनडे क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. मात्र तिसरा यजमान देश नामिबियाला आफ्रिकन क्वालिफायर स्पर्धेत चांगली कामगिरी करून विश्वचषकात आपलं स्थान पक्कं करावं लागेल. आयसीसी क्रमवारीत टॉप-8 मध्ये स्थान मिळवणारे संघ स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील. यजमानांव्यतिरिक्त उर्वरित 4 संघांना पात्रता फेरीतून स्पर्धेत स्थान निश्चित करावं लागणार आहे. नामिबिया, नेदरलँड्स, स्कॉटलंड, यूनायटेड अरब अमिराती, यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, नेपाळ आणि ओमान हे संघ विश्वचषकात स्थान मिळवण्यासाठी एकमेकांशी भिडतील.
महत्त्वाच्या बातम्या-
भुवनेश्वर कुमारनं रचला इतिहास, अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू