वेस्ट इंडीज क्रिकेट संघ आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी तयार असल्याचे दिसत आहे. वेस्ट इंडीज संघाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयसीसीने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओवत आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या वेस्ट इंडीज संघातील काही खेळाडून हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत.
आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी सर्व संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत आणि खेळाडू कसून सराव देखील करत आहेत. वेस्ट इंडीज संघाही विश्वचषक विजेता बनण्याच्या हेतूने जोरदार सराव करत आहे. असे असले तरी, खेळाडूंनी या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःसाठी वेळ काढल्याचे दिसते. बॉलिवुडमधील लोकप्रिय गाने ‘काला चष्मा’ यावर हे सर्वजण डान्स स्टेप्स करताना दिसले. चाहते या हा व्हिडिओ पाहून कमेंट्समध्ये व्यक्त होत आहेत.
https://www.instagram.com/reel/CjsisUAO3bb/?utm_source=ig_web_copy_link
आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “वेस्ट इंडीज संघाकडे मुव्ह्ज आहेत.” व्हिडिओच्या सुरुवातीला प्रत्येकजण स्वतःच्या डोळ्यांवरील चष्मा काढतो आणि नंतर पुन्हा घालतो. यादरम्यान सर्वजण एक खास डान्स स्टेप करतानाही दिसतात. आयसीसीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेकाजण माजी दिग्गज ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो आणि कायरन पोलार्ड यांची आठवण काढत आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले की, “गेल या सर्वांचे काम एकटा करू शकतो.” तर दुसऱ्या एकाने लिहिले की, “ड्वेन ब्रावोच्या अनुपस्थितीत पार्टी होऊच शकत नाही.” दरम्यान, वेस्ट इंडीजला विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना 17 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंडविरुद्ध खेळायचा आहे.
टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला वेस्ट इंडीज संघ –
निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मॅकॉय, रेमन रीफर, ओडियन स्मिथ, शामराह ब्रूक्स.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी20 विश्वचषकापूर्वी राहुलबद्दल आली मोठी प्रतिक्रिया; दिग्गज म्हणाला, ‘तोच मारणार ऑस्ट्रेलियाचं मैदान’
प्रो कबड्डी: मुंबई-जयपूरची विजयी लय कायम; पुणेरी पलटणची हाराकिरी





