आगामी आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार असून विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित झाला आहे. संघात भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल ४ वर्षांनंतर अश्विनचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन होत आहे.
यापूर्वी त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना वेस्टइंडीजविरुद्ध जुलै २०१७ मध्ये खेळला होता. त्यानंतर आता चार वर्षांच्या मोठ्या काळानंतर तो थेट भारतीय संघासोबत आयसीसी टी२० विश्वचषकात सामील होणार आहे. आपण या लेखात तीन कारणे पाहणार आहेत, ज्यामुळे अश्विनला टी२० भारतीय संघात संधी मिळण्यासाठी महत्त्वाची ठरली.
१) वाॅशिंगटन सुंदरला झालेली दुखापत :
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी सांगितले, “वाॅशिंगटन सुंदर दुखापतग्रस्त आहे. जेव्हा तुम्ही विश्वचषकासाठी जाता, तेव्हा तुम्हाला एका ऑफ स्पिनरची गरज असते. यूएईच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे ऑफ स्पिनरचे संघात असणे महत्वाचे आहे.” त्याचमुळे असे म्हटले जाऊ शकते की सुंदरची दुखापत अश्विनसाठी फायद्याची ठरली आहे.
२) आयपीएलमध्ये सततचे चांगेल प्रदर्शन :
गेल्या ४ वर्षात भारतीय टी२० संघात संधी मिळाली नसली, तरी रविचंद्रन अश्विन आयपीएलमध्ये खेळत आला आहे. त्याचे आयपीएलमधील प्रदर्शनही चांगेल आहे. भारतीय संघाचे निवडकर्ता चेतन शर्मानेही ही गोष्ट मान्य केली आहे आणि म्हटले, “अश्विनने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे, त्यामुळेच त्याने संघात त्याच्यासाठी जागा निर्माण केली आहे.”
३) भारतीय संघाला अश्विनच्या अनुभवाची गरज पडू शकते :
रविचंद्रन अश्विन २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियस ट्राॅफी स्पर्धांमध्ये खेळला आहे. त्याव्यातिरिक्त जागातल्या दिग्गज टी२० गोलंदाजापैकी एक आहे, हे त्याच्या आकड्यांवरून समजते. त्याने ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ६.९८ च्या इकाॅनमीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याव्यतिरिक्त त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा भारताला विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत फायदा होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, टी२० विश्वचषक गमावल्यास कर्णधारपदावरुन होणार पायउतार
जार्वोच्या षडयंत्रामुळे रद्द झाली पाचवी कसोटी…! नेटकऱ्यांनी टीम इंडियाच्या चाहत्यालाच धरले वेठीस
अंतिम कसोटी रद्द, मग मालिका २-१ की २-२ वर संपली? थेट आयसीसी घेणार निर्णय






