भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियान संघाला 132 धावांनी पराभूत केले. नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघ अवघ्या 91 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजा सामनावीर ठरला, पण आयसीसीकडून त्याच्यावरच मोठी कारवाई केली गेली.
माध्यमांतील वृत्तांनुसार आयसीसीच्या आचर संहितेचे उल्लंघन केल्यामुळे रविंद्र जडेजावर ही कारवाई केली गेली आहे. नागपूर कसोटीसाठी मिळणाऱ्या मॅच फिसच्या 25 टक्के रक्कम जडेजाला दंड म्हणून भरावी लागणार आहे. सामन्याच्या पहिल्या डावात जडेजावर चेंडूशी झेडझाट केल्याचा आरोप केला गेला. पण नंतर त्याने स्वष्टीकरण देत बोटाला मलम लावल्याचे सांगितले होते. पंचांची परवानगी न घेता बोटाला मलम लावल्यामुळे जडेजावर ही कारवाई केली गेली असल्याचे सांगितले गेले आहे. या चुकीसाठी जडेजाला एक डिमेरिस पॉइंट आणि 25 टक्के सामना शुल्क कापण्याची कारवाई आयसीसीकडून केली गेली
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. भारतीय संघासाठी पहिल्या डावात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विन () याने पाच विकेट्सचा हॉल पूर्ण केला. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हा 31 वा पाच विकेट्सचा हॉल होता आणि ही कामगिरी संघासाठी मॅच विनिंग ठरली. भारतीय संघासाठी पहिल्या डावाती पहिल्या दोन विकेट्स वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी घेतले. पण त्यानंतर खेळपट्टीवर पूर्णपणे फिरकी गोलंदाजांचे राज्य पाहायला मिळाले.
पहिल्या डावात रविंद्र जडेजा पाठोपाट रविचंद्रन अश्विनने देखील महत्वाच्या तीन विकेट्स घेत चाहत्यांचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू टॉड मर्फी या सामन्यातून कसोटी पदार्पण करू शकला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या. कोणत्याही खेळाडूसाठी पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरणे करणे म्हणजे स्वप्न असते. मर्फीने मात्र हे स्वप्न सत्यात उतरवले. जडेजा सामनावीर ठरण्यासाठी त्याचे अष्टपैलू प्रदर्शन कराणीभूत ठरले. जडेजाप्रमाणे अश्वननेही पाच विकेट्स गेतल्या, पण अश्विन फलंदाजीत मोठे योगदान देऊ शकला नाही. अश्विन पहिल्या डावात 23 धावा करून बाद झाला, पण जडेजाने मात्र 70 धावा कुटल्या.
(ICC took action against Ravindra Jadeja due to wrongdoing in live match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी
भारतीयांना सतावणाऱ्या मर्फीचा शमीने उठवला बाजार, गुडघ्यावर बसून भिरकावला गगनचुंबी षटकार; व्हिडिओ पाहाच