भारतात सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवच मानले जाते. त्याच्या नावावर असंख्य विक्रमांची नोंद देखील आहे, ज्यांची आज देखील तुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. मात्र, विराट कोहली त्याच्या बऱ्याच विक्रमांच्या जवळ पोहचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असणाऱ्या टी-20 विश्वचषकात रविवारी (23 ऑक्टोबर) होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात विराट कोहलीवर सगळ्यांचे लक्ष असणार आहे. कारण विराटकडे सचिनचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी आहे. सचिनचा ‘हा’ विक्रम विराटकडून तुटणार की नाही यावर सर्व चाहते नजर ठेवून आहेत.
काय आहे सचिनचा विक्रम?
हा विक्रम आहे आयसीसी स्पर्धांच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने विश्वचषकाच्या स्पर्धांमध्ये 23 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहली (Virat Kohli) यानेही विश्वचषकांच्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत 23 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा टप्पा पार केला आहे. जर विराटने या विश्वचषकात एकदा जरी अर्धशतक केले तर हा विक्रम त्याचाकडून मोडला जाईल.
आकडेवारी काय सांगते?
सचिन वनडे विश्वचषकाबरोबर केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळला असून त्याने एकही टी20 विश्वचषक खेळला नाही. त्याने इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिल(आयसीसी) स्पर्धांमध्ये आतापर्यंत 61 सामने खेळलेले आहेत. या 61 सामन्यात त्याने 7 शतके व 16 अर्धशतके केली आहेत. सचिनने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 6 शतके व 15 अर्धशतके ठोकली आहेत, तर चॅम्पियन्स ट्रॉफीतील 16 सामन्यात 1 शतक व 1 अर्धशतक ठोकले आहे. याउलट विराट कोहलीने खेळलेल्या 60 आयसीसी सामन्यांमध्ये 23 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने टी20 विश्वचषकामध्ये खेळलेल्या 21 सामन्यांमध्ये 10 अर्धशतके केली आहेत, तर एकदिवसीय विश्वचषकातील 26 सामन्यांमध्ये 2 शतके व 6 अर्धशतके केली आहेत. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमधील 13 सामन्यांमध्ये 5 अर्धशतके ठोकली आहेत.
जर विराटने एक अर्धशतक अजुन ठोकले तर सचिनचा हा देखील विक्रम तो मोडून काढेल. सचिनने काही वर्षांआधी एका कार्यक्रमात विराट कोहली व रोहीत शर्माचा उल्लेख त्याचा विक्रम तोडू शकणाऱ्या खेळाडूंमध्ये केलेला. त्यामुळे विराट कोहलीच्या या विश्वचषकातील कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष केंद्रीत असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली