---Advertisement---

क्रिकेटर असताना नशिबी आला नाही एकही विश्वचषक, आता लक्ष्मण प्रशिक्षकाच्या रूपात उंचावणार ट्रॉफी?

On: गुरूवार, फेब्रुवारी 3, 2022 9:15 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (ind u19 vs eng u19) यांच्यात ५ फेब्रुवारीला १९ वर्षाखालील विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ही आठवी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघ १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी भारताने १९ वर्षाखालील चार विश्वचषक जिंकले आहेत आणि आता पाचव्या विश्वचषकावर संघाजी नजर आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख वीवीएल लक्ष्मण (vvs lakshman) भारतीय संघासोबत विश्वचषक दौऱ्यावर आहेत. वेस्ट इंडीजमध्ये लक्ष्मणला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकणाऱ्या संघात सामील होण्याची संधी मिळाली आहे.

एका खेळाडूच्या रूपात लक्ष्मणला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही, पण प्रशिक्षकाच्या रूपात त्याला यावर्षी पहिल्यांदाच विश्वचषक संघात सामील होता आले आहे.

वीवीएस लक्ष्मणला २००३ साली भारताच्या विश्वचषक संघात निवडले गेले नव्हते आणि त्यानंतर मोठा वादही झाला होता. त्यानंतर किंवा त्यापूर्वीही लक्ष्मणला कधीच विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु आता विश्वचषक संघाला प्रशिक्षण देण्याची भूमिका ते पार पाडत आहेत. अशात त्यांची नक्कीच इच्छा असेल की, भारताच्या १९ वर्षाखालील संघाने अंतिम सामना जिंकून पाचव्यांदा विश्वचषक ट्रॉफी मिळवावी.

द्रविडचीही झाली होती निराशा
वीवीएल लक्ष्मणला त्यांच्या कारकिर्दीत एकदाही विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच राहुल द्रविडला कधी खेळाडूच्या रूपात विश्वचषक जिंकता आला नाहीय. द्रविडने २००७ विश्वचषकात भारताने नेतृत्व केले होते, पण बांगलादेशकडून पराभव मिळाल्यानंतर संघ स्पर्धेतून बाहेर झाला होता. तसेच २००३ साली भारतीय संघने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून पराभव पत्करला होता. त्यावेळी द्रविड संघाचा कर्णधार होता. द्रविडने एकून तीन विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले, पण एकदाही संघ विजयी ठरला नाही.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी कार्यरत असताना मात्र द्रविडच्या मार्गदर्शनात भारताने २०१८ मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला. त्यावेळी पृथ्वी शॉ संघाचे नेतृत्व करत होता आणि संघाला द्रविडचे मार्गदर्शन लाभले होते. आता यावर्षीच्या १९ वर्षाखालील विश्वचषकात लक्ष्मणही द्रविडप्रमाणे संघाला मार्गदर्शन करताना विश्वचषक जिंकू इच्छित असणार.

महत्वाच्या बातम्या –

वडिलांना बनवायचं होतं इंजिनियर, पण पोरानं निवडलं क्रिकेट; आता सेमीफायनलमध्ये ५००च्या स्ट्राईक रेटने काढल्या धावा

दुखापतग्रस्त जडेजाचा अष्टपैलू रिप्लेसमेंटही कोरोनाच्या विळख्यात! कर्णधार रोहितपुढील अडचणीत भर

भारतीय कसोटी संघातून रहाणे अन् पुजाराची होणार सुट्टी! बीसीसीआय अध्यक्षांच्या या वक्तव्याने दिले संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---