यावर्षी मार्च महिन्यात न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला वनडे विश्वचषकाचे (icc womens world cup 2022) आयोजन केले जाणार आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा देखील करण्यात आली आहे. हा संघ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कारण, चांगल्या फॉर्ममध्ये असलेली जेमिमा रॉड्रिग्ज (Jemima Rodrigues) आणि अष्टपैलू शिखा पांडे (Shikha Pandey) यांना १५ सदस्यीय संघात सामील केले गेले नाही. या दोघींना संघात सामील न करण्याविषयी प्रश्न विचारल्यावर मुख्य निवडकर्त्या नीतू डेविड (neetu david) यांनी अनोखा युक्तीवाद केला आहे.
नीतू यांना जेमिमा आणि शिखा यांच्या संघातील गैरहजेरीनंतर त्यांना प्रश्न विचारला गेला की, अखेर कोणत्या आधारावर विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड केली गेली आहे? त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की, आम्हाला या मुद्यावर बोलण्याची परवानगी मिळाली नाही. एवढेच नाही, तर नीतू यांना हे देखील माहिती नाहीय की, भारतीय महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे की नाही. विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाची घोषणा शक्यतो पत्रकार परिषद घेऊन केली जाते, परंतु यावर्षी तसे झाले नाही.
जमिमाने मागच्या काही महिन्यांपूर्वी खेळल्या गेलेल्या द हंड्रेड लीगमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले होते. मात्र, तरीही तिला भारतीय संघात निवडले गेले नाही. तसेच टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत आणि एका टी२० सामन्यासाठीही तिला निवडले गेले नाही. अशात तिला संघातून बाहेर करण्यामागचे कारण कोणीच स्पष्ट करू शकलेले नाही.
आयसीसी महिला विश्वचषक २०२२ आणि न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष , स्नेह राणा, झुलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंहइा कुर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड़, पूनम यादव.
स्टँडबाय खेळाडू –
एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, रिचा घोष, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेधना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड़, पूनम यादव, एस मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादुर.
महत्त्वाच्या बातम्या-
PHOTO: क्विंटन डी काॅक बनला बाप माणूस, नवजात परीचा नावासह शेअर केलाय फोटो (mahasports.in)