भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज (mithali raj) मागच्या काही काळापासून तिच्या स्ट्राइक रेटच्या कारणास्तव टीकाकारांच्या निशाण्यावर आली आहे. आगामी काळात भारताला न्यूझीलंडमध्ये आयोजित विश्वचषकात सहभाग घ्यायचा आहे आणि त्यापूर्वी न्यूझीलंविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे. आगामी मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच न्यूझीलंडला रवाना होणार आहे. अशात मितालीला जेव्हा तिच्या स्ट्राइक रेटसंदर्भात प्रश्न विचारला गेला, तेव्हा ती रागावल्याचे पाहायला मिळाले.
आगामी मालिकेला रवाना होण्यापूर्वी एकदिवसीय कर्णधार मिताली राज आणि मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार (ramesh powar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मिताली राजला प्रश्न विचारला गेला की, मागच्या काही काळापासून संघातील खेळाडूंचा स्ट्राइक रेट चांगला नाहीये, ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर संघ यावर चर्चा करणार आहे का ? आता या गोष्टीवर लक्ष दिले जाणार आहे का ? पत्रकार परिषदेतील या प्रश्नानंतर मिताली नाराज झाल्याचे दिसले आणि तिने पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारला.
खराब स्ट्राइक रेटवर विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मिताली म्हणाली की, “तुम्ही स्ट्राइक रेटला जास्त महत्व देता, पण इतर संघांचा स्ट्राइक रेट देखील पाहिला पाहिजे. जर ऑस्ट्रेलिया मालिकेविषयीच बोलायचे झाले, तर त्या मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात बेथ मूनीने ८० चेंडूत ५० धावा केल्या होत्या. ती सामना जिंकवणारी खेळी ठरली होती. क्रिकेट एक असा खेळ आहे, जो परिस्थितीनुसार खेळला जातो, स्ट्राइक रेटच्या हिशोबाने नाही. आम्ही स्ट्राइक रेटवर लक्ष देत आहोत, पण त्यापेक्षा जास्त सामना कसा जिंकायचा, याला महत्व आहे.”
“जेव्हा आम्ही २५०-२७० धावांचा पाठलाग करतो, तेव्हा एका चांगल्या स्ट्राइक रेटची गरज असते. पण याचा अर्थ असा नाहीय की, आम्ही केवळ त्याच्यावरच लक्ष द्यायचे. आमचा प्रयत्न असतो की भागिदारी करावी, संघाला अडचणीतून बाहेर काढावे आणि सामना जिंकावा. या गोष्टी स्ट्राइक रेटने होत नाहीत. या गोष्टी तेव्हाच होता, जेव्हा आपण खेळावर लक्ष देतो,” असे मिताली पुढे बोलताना म्हणाली.
दरम्यान, मितालीचा एकदिवसीय क्रिकेटमधील स्ट्राइक रेट ५० च्या आसपास राहिला आहे. संथ गतीने धावा करण्यावरून अनेकदा मितालीवर टीका झाल्या आहेत. अशात आगामी मालिकेत भारतीय महिला संघाचा स्ट्राइक रेट सुधारल्याचे पाहायला मिळेल, अशी चाहत्यांचीही अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
एक शतकी खेळी आणि विक्रमांची रांग! डी कॉकने सोडले रथी-महारथींना मागे
टीम इंडियासाठी ‘विलन’ ठरतोय रिषभ! यष्टिरक्षणातील चुकांची मोजावी लागतेय संघाला किंमत
द्रविड प्रशिक्षक म्हणून पहिल्याच परदेशी दौऱ्यात ‘नापास’, तरीही पाकिस्तानी दिग्गजाने केली पाठराखण
व्हिडिओ पाहा –