भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये विजय खेचून आणला आहे. त्यामुळे भारताचे उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. अशात आगामी सामने भारतीय संघासाठी उपांत्य फेरीच्या तयारीसाठी खूपच महत्त्वाचे असणार आहेत. असे असले, तरीही भारतीय संघाचा एक खेळाडू सध्या खूपच फ्लॉप ठरत आहे. कर्णधार रोहित शर्मा याने या खेळाडूला आतापर्यंत सहा सामन्यात संधी दिली आहे.
कोण आहे तो खेळाडू?
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघासाठी आतापर्यंत प्रत्येक सामन्यात कोणी ना कोणी नवीन हिरो ठरला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. तसेच, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हेदेखील आपला जलवा दाखवत आहेत. मात्र, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) अद्याप लयीत परतला नाहीये. कर्णधार रोहितने त्याला सातत्याने संधी दिली आहे, पण तो एकाही सामन्यात मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला नाही. यावर सोशल मीडियावरही त्याला ट्रोल केले जात आहे. उपांत्य फेरीत त्याचे फॉर्ममध्ये येणे खूपच गरजेचे आहे.
I don’t know how this man @Shreyas Iyer is fitting into playing eleven?? https://t.co/8bGuC88L0Q
— Durga Prasad 🇮🇳🙏🕉️ (@Durga_prasad20) October 30, 2023
अय्यरचे विश्वचषकातील प्रदर्शन
श्रेयस अय्यर याने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात 33.50च्या सरासरीने फक्त 134 धावा केल्या आहेत. तो यादरम्यान फक्त 1 वेळा 50 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही श्रेयस अय्यर याची बॅट शांतच होती. तो फक्त 16 चेंडूत 4 धावांवर तंबूत परतला. त्याचे हे प्रदर्शन आगामी सामन्यांमध्ये संघाची मोठी चिंता ठरू शकते. खरं तर, मागील वर्षी अय्यरने वनडेत भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या, पण यावेळी तो ही कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
रोहित-विराट आघाडीवर
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत रोहित शर्मा सर्वात पुढे आहे. त्याने 6 सामन्यात 66.33च्या सरासरीने 398 धावा केल्या आहेत. तसेच, विराट कोहली याबाबतीत दुसऱ्या स्थानी असून त्याने 6 सामन्यात 88.50च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत. (icc world cup 2023 cricketer shreyas iyer flop performance continue for team india 2023)
हेही वाचा-
बाबर आझमला आवडतात भारताचे वर्तमानातील ‘हे’ दोन दिग्गज फलंदाज, वाचून 140 कोटी भारतीय होतील खुश
पुण्यात अफगाणिस्तानपुढे श्रीलंकेचे आव्हान, संभावित Playing XI ते खेळपट्टी, सर्व माहिती एकाच क्लिकवर