---Advertisement---

‘भारत आणि जगाला आठवण करून द्या…’, वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची वेळ आलेल्या इंग्लंडला माजी कर्णधाराचा सल्ला

On: शुक्रवार, ऑक्टोबर 27, 2023 12:46 PM
Jos-Buttler-And-Joe-Root
---Advertisement---

गतविजेत्या इंग्लंड संघाला गुरुवारी (दि. 26 ऑक्टोबर) श्रीलंकेकडून 8 विकेट्सने दारुण पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या पराभवानंतर चोहोबाजूंनी कर्णधार आणि संघावर ताशेरे ओढले जात आहेत. इंग्लंडला पुढील सामन्यात भारतीय संघाचा सामना करायचा आहे. अशात या सामन्यापूर्वी इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघाला सल्ला दिला आहे की, त्यांनी लखनऊमध्ये भारताला पराभूत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.

काय म्हणाले हुसेन?
नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी म्हटले की, इंग्लंड संघाला आपला सर्वोत्तम सामना खेळून भारतीय संघाला पराभूत करण्यावर लक्ष दिले पाहिजे. ते म्हणाले, “खेळाडूंना या स्थितीची जबाबदारी घ्यावी लागेल. मी त्यांच्यापैकी नाही, जे म्हणतील आपल्या देशाच्या प्रतिष्ठेसाठी खेळा, पण आता इंग्लंडला असे करण्याची खूपच गरज आहे. इंग्लंडने रविवारी लखनऊमध्ये भारताची पार्टी बिघडवली पाहिजे. त्यांना भारत आणि जगाला आठवण करून द्यावी लागेल की, ते किती दिग्गज क्रिकेटपटू राहिले आहेत आणि आताही आहेत.”

‘द हंड्रेडचा दोष नाही’
नासिर हुसेन यांनी इंग्लंडच्या खराब प्रदर्शनासाठी खेळाडूंना दोषी ठरवले. अनेकांचे म्हणणे आहे की, द हंड्रेडसारख्या स्पर्धेचा प्रभाव इंग्लंडवर पडला. मात्र, नासिर हुसेन यांना असे वाटत नाही. त्यांच्या मते, निरुपयोगी बहाणे आहेत. ते म्हणाले, “मी आपल्या देशातील लोकांचे बोलणे ऐकले की, ही चूक द हंड्रेड आणि ब्लास्टची आहे. तथ्य हे आहे की, इंग्लंडच्या सर्वोत्तम खेळाडूंनी 50 षटकांचे सामने जास्त खेळले नाहीत. हे सर्व निरुपयोगी बहाणे आहेत.”

इंग्लंडला काय करावं लागेल?
इंग्लंड संघाला जर उपांत्य सामन्यात पोहोचायचे असेल, तर त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. याव्यतिरिक्त त्यांना पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागेल. इंग्लंड संघाकडे 10 गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. मात्र, त्यांना इतर संघांच्या प्रदर्शनाचाही आधार घ्यावा लागेल.

पुढील सामन्यात भारताचे आव्हान
भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) संघात रविवारी (दि. 29 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेचा 29वा सामना खेळला जाणार आहे. हा सामना लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात जर इंग्लंड संघ पराभूत झाला, तर ते विश्वचषकातून बाहेर पडतील. ते सध्या पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. (icc world cup 2023 england former captain nasser hussain wants england to spoil indias party at lucknow ekana stadium )

हेही वाचा-
‘शाहिद आफ्रिदीने माझ्यावर इस्लाम धर्म…’, माजी पाकिस्तानी खेळाडूचा धक्कादायक आरोप
‘मी तर त्याच दिवशी निवृत्त झालेलो, पण…’, 3 वर्षांनंतर धोनीचा गौप्यस्फोट, सांगितली Retirementची खरी तारीख

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---