---Advertisement---

कोरोना नाही तर ‘या’ तीन कारणांमुळे बीसीसीआयने केले टी-२० विश्वचषकाचे भारतातून केले स्थलांतर

On: सोमवार, जून 28, 2021 8:15 PM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रस्तावित टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी ( २८ जून ) झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, भारत येथे होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीला लवकरच अधिकृतपणे माहिती देणार आहे. त्यांनी टी-२० विश्वचषकाचे नियोजन यूएई व ओमान मध्ये केले आहे. आयसीसी लवकरच टी२० विश्वचषकाच्या तारखांची घोषणा करेल. बीसीसीआयने यासाठी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याचे कारण सांगितले आहे. आणि ते खेळाडूंच्या सुरक्षा व आरोग्याशी खेळू शकत नाही, असेही म्हंटले आहे.

मात्र आता बीसीसीआयने कोरोनामुळे नाही तर इतर काही कारणांमुळे ही स्पर्धा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या लेखात आपण याच तीन कारणांबाबत जाणून घेऊया.

१) करमुक्तीबाबत होणारा वाद- टी२० विश्वचषक आयोजनाबाबत बीसीसीआय आणि आयसीसीमधील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे सरकारकडून कर सवलतीचा. आयसीसीने बीसीसीआयला टी२० विश्वचषकाबाबात करावर सवलतीची मागणी केली होती. जर बीसीसीआयला भारतीय सरकारकडून करामध्ये सवलत मिळवता नाही आली तर त्यांना २२० कोटी रुपये आपल्या खिशातून भरावे लागतील. बीसीसीआयला यावर निर्णय आयसीसीला फेब्रुवारी २०२१ मध्ये कळवायचा होते. परंतु भारतीय सरकारकडून उत्तर न मिळाल्यामुळे बीसीसीआय आयसीसीकडून सतत वेळेची सवलत मागत होते.

नुकतेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी भारत सरकारच्या संबधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु त्यांनी करावर सवलत देण्यास मनाई केली. बीसीसीआयकडे त्यामुळे दोन पर्याय होते. एक म्हणजे आपल्या खिशातून २२० कोटी रुपये द्यायचे किंवा स्पर्धा स्थलांतरित करायची. यातील दुसरा पर्याय बीसीसीआयने निवडल्याचे दिसते आहे.

२) राज्य संघटनेचे राजकारण- टी२० विश्वचषक यूएईमध्ये हलवण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे राज्य संघटनेचे राजकारण टाळणे आहे. बीसीसीआयने नुकतेच आयपीएल २०२१ चे आयोजन भारतात केले होते. प्रथमतः आयपीएलचे सामने फक्त ३ शहरांमध्ये खेळवले जाणार होते. परंतु त्यानंतर प्रत्येक राज्य संघटनेच्या दावेदारीच्या दबावामुळे सामने ६ शहरांमध्ये आयोजित करण्यात आले. परंतु पहिल्या सत्रानंतर बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. अशा परिस्थितीमध्ये बीसीसीआयचा ९ शहरांमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्याचा निर्णय होता, यामध्ये बदल करणे महत्वाचे होते.

जर बीसीसीआयला विश्वचषक आयोजित करायचा असेल तर ते दोन ते तीन शहरांपुरते मर्यादित ठेवणे आवश्यक होते. जरी बीसीसीआयने एका राज्य संघटनेवर जबाबदारी दिली असती तर बाकीचे संतप्त झाले असते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि राज्य संघटनेला नाराज न करण्यासाठी स्थळ बदलणे हा योग्य पर्याय होता.

३) आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंचा समावेश करण्याचा दबाव- हे लक्षात घेण्यासारखे आहे की बीसीसीआयसाठी आयपीएलचे उर्वरित सामने आयोजित करणे खूप महत्त्वाचे ठरले आहे. कारण जर ते असे करण्यात अपयशी ठरले तर त्याचे सुमारे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. हे लक्षात घेता बीसीसीआयने इंग्लंड दौर्‍यानंतर आयपीएलचे उर्वरित सामने टी२० विश्वचषक होण्यापूर्वी यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने विंडो आणि ठिकाण निवडले आहे, परंतु या स्पर्धेत परदेशी खेळाडूंना खेळणे अवघड जात होते. आयपीएलमध्ये भाग घेतल्यानंतर, परदेशी खेळाडूंना टी२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघात दाखल होणे आणि विलगीकरणाचे नियम पाळणे खूप कठीण गेले असते.

त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये न पाठविण्याच्या निर्णयानंतर, बीसीसीआयने उर्वरित खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश करणे आवश्यक झाले. अशा परिस्थितीत आयपीएल आणि टी२० विश्वचषक आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी आयोजित करणे बीसीसीआयसाठी सर्वात सोपे होते. जेणेकरून आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंनी जास्त प्रवास करणे टाळता येईल आणि एका बायोबबलमधून दुसर्‍या ठिकाणी सहज जाता येऊ शकेल. म्हणूनच आयपीएल आणि टी२० विश्वचषक या दोन्ही स्पर्धांच्या आयोजनासाठी बीसीसीआयने युएईचा पर्याय निवडला आहे.

महत्वाच्या बातम्या:

गार्डनमध्ये रोहितनं केली आपल्या चिमुकलीसह मस्ती; सोबतच दिसली समायराची गोंडस मैत्रीण

शुभमंगल सावधान! तमिळनाडूचा ‘हा’ क्रिकेटपटू प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शकाच्या मुलीबरोबर अडकला लग्नबंधनात

राही सरनोबतने पुन्हा उंचावली देशाची मान, नेमबाजी विश्वचषकात जिंकले सुवर्ण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---