---Advertisement---

कोहलीच्या टीम इंडियाचे त्रिशतक पूर्ण, बाकी संघांचे गुण नक्की पहा…

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 6:03 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघातील पहिल्या कसोटी सामन्यात(1st Test) आज(16 नोव्हेंबर) भारताने तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडीही घेतली आहे.

या विजयानंतर भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 300 गुणांचा टप्पा गाठला आहे. भारताला या कसोटीतील विजयानंतर कसोटी चॅम्पियनशीपचे 60 गुण मिळाले आहेत.

भारताने आत्तापर्यंत कसोटी चॅम्पियनशीपमध्ये 6 सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही.

तसेच बांगलादेशचा हा कसोटी चॅम्पियनशिपमधील पहिलाच सामना होता. पण या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या खात्यात शून्य गुण आहे.

तसेच सध्या भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या गुणतालिकेत 300 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंड आणि श्रीलंकेपेक्षा तब्बल 240 गुणांनी पुढे आहे.

या गुणतालिकेत प्रत्येकी 2 सामन्यांनंतर 60 गुणांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.

त्याचबरोबर त्यांच्या पाठोपाठ 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी 56 गुणांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात शून्य गुण आहेत. तर पाकिस्तानच्या अजून कसोटी चॅम्पियनशिपच्या सामन्यांना सुरुवात झालेली नाही.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटीनंतर कसोटी चॅम्पियशीपची गुणतालिका-

असे दिले जातात कसोटी चॅम्पियनशीपमध्ये गुण – 

ही चॅम्पियनशीप स्पर्धा आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या 12 देशांपैकी 9 देशांच्या संघात होत आहे. यामध्ये भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि वेस्ट इंडीज या 9 देशांचा समावेश आहे.

तसेच 9 संघांना प्रत्येकी 8 प्रतिस्पर्ध्यांपैकी 6 संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहे. यामध्ये तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका परदेशात खेळायच्या आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असतील.

या चॅम्पियशीपमध्ये होणाऱ्या प्रत्येक मालिकेसाठी एकूण 120 गुण असतील. म्हणजेच जर दोन सामन्यांची मालिका असेल तर या मालिकेतील एक सामना जिंकणाऱ्या संघाला 60 गुण मिळतील.

पण सामना जर अनिर्णित राहिला तर दोन्ही संघाला प्रत्येकी 20 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोन्ही संघाला प्रत्येकी 30 गुण दिले जातील. पराभूत होणाऱ्या संघाला एकही गुण मिळणार नाही.

जर मालिका 3 सामन्यांची झाली तर एका सामन्यात जिंकणारा संघ 40 गुण मिळवेल. तर अनिर्णित झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 13 गुण आणि बरोबरी झाली तर दोन्ही संघांना प्रत्येकी 20 गुण दिले जातील.

या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये साखळी फेरीनंतर ज्या दोन संघांचे सर्वाधिक गुण असतील त्या दोन संघात जून 2021 मध्ये लॉर्ड्सवर अंतिम सामना पार पडेल.

कसोटी चॅम्पियनशिपमध्ये असे मिळणार गुण – 

Screengrab: icc-cricket.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---