इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तर लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. या दोन्ही सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने एकहाती झुंज दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. दरम्यान तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकरने जो रूटला मोलाचा सल्ला दिला आहे.
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते, इंग्लंड संघाला पहिल्या दोन कसोटी सामन्यात बेन स्टोक्सची कमतरता जाणवली. सुनील गावसकर यांनी द टेलीग्राफ इंडियाच्या स्तंभात लिहिले की, “जर मी रूटच्या जागी असतो, तर मी बेन स्टोक्सला पुन्हा बोलवले असते आणि त्याला खेळायला सांगितले असते. तो इंग्लंड संघासाठी असा खेळाडू आहे, जो कुठल्याही परिस्थितीत येऊन सामना बदलू शकतो. हा खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मोलाचे योगदान देऊ शकतो.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले आहे की, “परंतु, ही एक दुर्दैवाची बाब आहे. कारण जो व्यक्ती क्रिकेट खेळण्यासाठी जन्माला आला आहे. तो असे करण्यास असमर्थ आहे. ही केवळ इंग्लंडसाठीच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वासाठी दुर्भग्याची गोष्ट आहे. कारण स्टोक्स सारखा खेळाडू अनेक पिढ्यानंतर घडत असतो.”
स्टोक्सने मानसिक आरोग्यावर लक्ष वेधून करण्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे त्याने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून आणि इतर स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.
“पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा अनेकांना वाटले होते की, इंग्लंड संघ हा सामना जिंकणार. परंतु, शेवटच्या दिवशी १८० धावा करणे देखील कठीण असते. जसं की इंग्लंड संघाचा डाव १२० धावांवर संपुष्टात आला होता आणि हा सामना इंग्लंडने मोठ्या अंतराने गमावला होता. इंग्लंडचा संपूर्ण डाव जो रूटवर निर्भर असतो. जर तो मोठी खेळी खेळण्यास अपयशी ठरला तर इंग्लंड संघाला मोठ्या अंतराने पराभवाचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे भारतीय संघाने इंग्लंड संघाला मानसिक धक्का दिला आहे. त्यामुळे इंग्लंड संघाला या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत,” असे सुनील गावसकर यांनी आपल्या स्तंभात लिहिले.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या २५ ऑगस्टपासून लीड्समध्ये पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जो रूट चुकला, मग प्रशिक्षकांनी त्याला रणनिती बदलण्यास का सांगितले नाही?’; माजी क्रिकेटरचा निशाणा
मोठी बातमी! इंग्लंड संघाला जबर धक्का; ‘हा’ दिग्गज खेळाडू तिसऱ्या कसोटीतून बाहेर
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी