भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने २ वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. परंतु भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात यश आले नाही. यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाणार आहे.
या स्पर्धेत विराट कोहलीने ३ वेळेस भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु पहिल्यांदाच विराट कोहली टी-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधाराच्या भूमिकेत मैदानात उतरणार आहे. परंतु, जर काही घडले आणि विराट कोहली संघाचे नेतृत्व करू शकला नाही, तर भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न सर्वानाच पडला असेल. यावर माजी भारतीय क्रिकेटपटूने उत्तम पर्याय सुचवला आहे.
हे तर निश्चित आहे की, आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करेल. परंतु माजी भारतीय क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्यामते, जर काही प्रसंग घडला आणि विराट कोहलीला संघाचे नेतृत्व करता आले नाही. तर रोहित शर्मा हा उत्तम पर्याय असू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. (If Indian team will be in Trouble, Rohit Sharma can replace Virat Kohli in icc T20 world cup says dip Dasgupta)
आपल्या यूट्यूब चॅनेलवर चर्चा करताना दीप दासगुप्ता म्हणाले की, ‘रोहितने यापूर्वी देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. परंतु एक मुख्य कर्णधार आणि तात्पुरता कर्णधार यांच्यात खूप फरक आहे. कारण एक तात्पुरता कर्णधार म्हणून आपल्याला संघात फारसे बदल करावे लागत नाही. परंतु जेव्हा तुम्ही मुख्य कर्णधार असता तेव्हा तुम्हाला बदल करायचे असतात. कारण त्यावेळी कर्णधार संघ आपल्या मार्गाने चालवण्याच्या प्रयत्नात असतो.’
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तीन-चार महिन्यांपूर्वी कर्णधार बदलणे रोहित, कोहली आणि भारतीय संघासाठी देखील योग्य नसेल. परंतु मला वाटते की, विश्वचषक स्पर्धा एका अर्थाने खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. कारण या स्पर्धेत काही चुकीचे घडले तर, रोहित विराटाचे स्थान घेण्यासाठी प्रबळ दावेदार असेल.’
रोहित शर्माने भारतीय संघासाठी एकूण १९ सामन्यात नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये त्याला १५ सामन्यात विजय मिळवून देण्यात यश आले आहे. यात २०१८ मध्ये मिळवलेल्या निदाहास ट्रॉफीचा देखील समावेश आहे. यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान यूएई आणि ओमानमध्ये करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
आऊटस्विंगर की इनस्विंगर? इंग्लिश गोलंदाजाच्या चतुर गोलंदाजीने गोंधळला फलंदाज, ‘अशी’ गमावली विकेट
द्रविडने नकार दिल्यास ‘हे’ ३ दिग्गज घेऊ शकतात टीम इंडियाचे महागुरु शास्त्रींची जागा
मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी विराजमान, विरोधकांवर कारवाई