जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. जर परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही तर, आयपीएलच्या आयोजनासाठी पुढे वेळ मिळणे कठीण आहे.
परिणामत: बीसीसीआयला आयपीलचा १३वा हंगाम (IPL 13th Season) रद्द करावा लागू शकतो. जर असे झाल्यास, केवळ बीसीसीआयला (BCCI) नाही तर, भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचेही मोठे नुकसान होऊ शकते.
आयपीएल रद्द झाल्यास भारताची होणारी ३ मोठी नुकसान-
-इंडीयन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये जगभरातील दमदार क्रिकेटपटू हे भारतीय क्रिकेटपटूंसोबत खेळत असतात. अशात ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापुर्वी भारतीय क्रिकेटपटूंना आयपीएल २०२०च्या मदतीने सराव करण्याची चांगली संधी होती. पण, जर आयपीएल झाले नाही तर भारतीय क्रिकेटपटूंच्या हातून ही सुवर्णसंधी निघून जाईल.
१८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत यजमान ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक (T20 World Cup) होणार आहे. यात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यात एकूण ४५ सामने होणार आहेत.
-टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी आयपीएल खूप महत्त्वपूर्ण समजले जाऊ लागले होते. कारण, आयपीएलद्वारे खेळाडूंना फक्त सराव करण्याची संधी नव्हती, तर काही वरिष्ठ आणि युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत येऊन संघात प्रवेश मिळवण्याची मोठी संधी होती. यात एमएस धोनी (MS Dhoni), सुरेश रैना (Suresh Raina), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), शुभमन गिल (Shubman Gill), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि खलील अहमद (Khaleel Ahmed) या खेळाडूंचा समावेश होतो.
या सर्व खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन करत टी२० विश्वचषकातील आपले स्थान निश्चित करण्याची चांगली संधी होती, पण वेळेनुसार त्यांची ही संधीही हातून निघून जाताना दिसत आहे. निवडकर्त्यांना आयपीएलद्वारे टी२० विश्वचषकासाठी मजबूत खेळाडूंनादेखील संघात समाविष्ट करता आले असते, पण तेही आता अवघड होण्याची लक्षणे दिसत आहेत.
-एवढेच नव्हे तर, आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला पैशांचे मोठे नुकसान होऊ शकते. आयपीएलच्या मदतीने दरवर्षी अब्ज रुपये कमवणाऱ्या बीसीसायला यावेळी कित्येच हजार कोटींचा ठप्पा बसू शकतो. बीसीसीआयसोबत त्यांच्या भागीदारांनाही मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.
आयपीएलच्या टायटल प्रायोजकाला जवळपास ४०० कोटींचे नुकसान होऊ शकते. तर, प्रक्षेपण करणाऱ्या स्टार इंडियाला ३२६९.५० कोटींचे नुकसान झेलावे लागू शकते. व्हिवोने आयपीएल शीर्षकाचे प्रायोजन ५ वर्षांसाठी २००० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर, स्टार इंडियाने आयपीएलचे प्रसारण करण्याचा अधिकार १६३४७.५० कोटी रुपयांना विकत घेतला आहे.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख