---Advertisement---

“त्याला कर्णधार बनवणे चुकीचा निर्णय ठरेल”

On: शुक्रवार, फेब्रुवारी 4, 2022 9:50 PM
india-test-team
---Advertisement---

विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. मर्यादित षटकांचा कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत या तिघांची नावे कसोटी कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. परंतु या तिघांव्यतिरिक्त अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचेही नाव कर्णधारपदासाठी चर्चेत येत आहे. अशात भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (bharat arun) यांनी अश्विनला कर्णधार बनवण्यासंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

भरत अरुण अश्विनला कसोटी कर्णधारपद देण्याच्या विरोधात आहे. अश्विनला कर्णधारपद न देण्यामागे त्यांनी कारणही स्पष्ट केले आहे. अरुण यांच्या मते संघाचा नवीन कर्णधार हा एक फलंदाज असावा. अरुण यांच्या मते जेव्हा भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हनमध्ये फक्त एक फिरकी गोलंदाज हवा असेल, तेव्हा अनेकदा रवींद्र जडेजाला अश्विनपेक्षा महत्व मिळणार आहे. अशात अश्विन जर कर्णधार असेल, तर संघाला सतत कर्णधार बदलावा लागू शकतो.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, “जेव्हा तुमचे नियोजन बदलेल, तेव्हा काय होणार ? मला वाटते की सध्याच्या स्थितीत गोलंदाजाला कर्णधार बनवणे आव्हानात्मक ठरेल. तुम्ही वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर ही लक्ष ठेवता. जेव्हा तुम्ही फक्त एका फिरकी गोलंदाजासह खेळात, तेव्हा काय होणार? हा फिरकी गोलंदाज जडेजा असेल आणि त्याचे कारण संघाची रणनीती असेल. तेव्हा हा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे कसोटी कर्णधाराच्या रूपात मी फलंदाजाला निवडेल.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---