ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने मालिका काबीज केली. यामध्ये भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संजू सॅमसन अडचणीचा सामना करताना दिसला. त्याने तीन सामन्यात फक्त 48 धावा केल्या. त्यामुळे आता दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ‘संजू सॅमसनने आपल्या चुकातून लवकरच शिकले पाहिजे. नाहीतर दुसरा कोणता तरी फलंदाज प्लेईंग इलेव्हन मध्ये त्याची जागा घेईल.’
संजू सॅमसन गुणवान फलंदाज
हरभजन सिंग एका माध्यमाशी चर्चा करतांना म्हणाला, “संजूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. तो अजून ही आपल्या पहिल्या, दुसर्या दौर्यावर आहे, तो शिकेल.
आपल्याला माहित आहे, की त्याच्यामधे क्षमता आहे आणि मालिका जिंकली आहे. हे लोक भारतीय क्रिकेटचे भविष्य असतील. तुम्हाला माहित आहे की, जर ते चुका करणार नाहीत, तर शिकणार नाहीत. मला विश्वास आहे की संजू सॅमसन जवळ गुणवत्ता आहे. आणि तो शिकणार आहे व तो इथून पुढे चांगली कामगिरी करेल.”
हरभजन सिंग पुढे म्हणाला, “जर तो स्पष्टपणे शिकला नाही तर दुसरी कोणीतर येवून त्याची जागा घेईल. कारण चौथा क्रमांक हा महत्वपूर्ण भाग आहे. तुम्हाला संधी मिळाली आहे तर तुम्ही ती पकडून ठेवले पाहिजे. या दौऱ्यात नाही जमलं परंतु पुढील दौऱ्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार व्हावे लागेल. हे निश्चित करावे लागेल की तुम्ही मिळालेल्या संधीचा लाभ उठवत आहात. ”
संजू सॅमसनने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करताना भारतीय संघात फलंदाज म्हणून जागा मिळवली. त्याने पहिला वनडे सामना 2015 साली खेळला होता. मात्र यंदा त्याने 6 डावात काही खास फलंदाजी केली नाही. ऑस्ट्रेलिया दौर्यात टी-20 मालिकेत त्याने 23, 15 आणि 10 अशाच धावा केल्या.
संबंधित बातम्या:
– कोहलीची अनुपस्थिती या खेळाडूसाठी ठरणार सर्वात फायदेशीर, हरभजन सिंगने सांगितले नाव
– रहाणे आक्रमक कर्णधार, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची स्तुतिसुमने
– आयसीसी टी-२० क्रमवारी जाहीर: केएल राहुल आणि विराट कोहलीची आगेकूच, पटकाविले हे स्थान