भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) संघाची घोषणा करू शकते. विशेष म्हणजे, हार्दिक पंड्या मागील एक महिन्यापासून दुखापतग्रस्त असल्यामुळे बीसीसीआय रोहित शर्मा याला पुन्हा टी20 संघाचे नेतृत्व करण्यासाठी मनवू शकते.
खरं तर, मागील वर्षी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टी20 संघाचे नेतृत्व करणे सोडले होते. अशात पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah), निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांची भेट घेतील. यामध्ये विश्वचषकासाठीचा रोडमॅप तयार केला जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 संघाचे नेतृत्व करण्यासाठी बीसीसीआयकडून रोहितची मनधरनी
खरं तर, टी20 क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाल्यामुळे निवडकर्त्यांकडे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) किंवा रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोघांपैकी एकाला कर्णधार बनवण्याचा पर्याय उरला आहे. रोहितने यापूर्वीच सांगितले आहे की, त्याला टी20 क्रिकेटमध्ये खेळायचे नाहीये, पण त्याने ज्याप्रकारे अलीकडील वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेत नेतृत्व केले, त्यावरून बीसीसीआयला वाटते की, त्याने पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकापर्यंत या क्रिकेट प्रकारात संघाचे नेतृत्व सांभाळले पाहिजे.
अशातच बीसीसीआयच्या सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, “हा प्रश्न कायम आहे की, हार्दिक परत आल्यावर काय होईल, पण बीसीसीआयला वाटते की, जर रोहित टी20त नेतृत्व करण्यास तयार झाला, तर तो टी20 विश्वचषकात नेतृत्व करेल. जर रोहितने सहमती दर्शवली नाही, तर सूर्या दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 संघाचा कर्णधार कायम राहील.”
तसेच, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची जोडी दीर्घ काळ दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन करत आहे. अशात, अजिंक्य रहाणेला बाहेर केले जाऊ शकते. तसेच, चेतेश्वर पुजाराकडे अजूनही संघात जागा मिळवण्याची शक्यता खूपच कमी आहे. (if this happened then Suryakumar Yadav will be the next captain, know how here)
हेही वाचा-
‘बॉलर्सचा उपयोगच काय, त्याऐवजी मशीन वापरा’, भारतीय दिग्गजाची घणाघाती टीका
‘या’ तारखेला सुरू होणार आयपीएल 2024 हंगाम! फायनलनंतर 10 दिवसांमध्येच खेळायचाय विश्वचषक