संजू सॅमसन आगामी आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करताना दिसेल. त्याच्या नेतृत्वात मागच्या काही आयपीएल हंगामांमध्ये राजस्थानचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. असे असले तरी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन भारतीय संघातील आपले स्थान पक्के करू शकला नाहीये. असे असले तरी, आगामी टी-20 विश्वचषकासाठी सॅमसन भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतो, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने मांडले.
इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होत आहे. आयपीएलचा 17 वा हंगाम यावर्षी खेळला जात आहे. पहिला सामना 22 मार्च रोजी आयोजित केला गेला आहे. पण त्याआधी माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्रा याने राजस्थान रॉयल्स संघ आणि त्यांचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यांना एक खास सल्ला दिला. आकाश चोप्राच्या मते आयपीएलच्या आगामी हंगामात संजू सॅमसनकडे चांगले प्रदर्शन करून टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी आहे.
आपल्या युट्यूब चॅनलवर आकाश चोप्राने नुकताच हा व्हिडिओ शेअर केला. यात माजी सलामीवीर म्हणतो की, “राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंकडे खूप साऱ्या संधी आहेत. यशस्वी जयस्वालकडे ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी आहे. जोस बटलरकडे पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवून देण्याची संधी आहे. संजू सॅमसन याच्याकडे टी-20 विश्वचषकासाठी पात्र होण्याची संधी आहे. ध्रुव जुरेसाठीही आपण हेच म्हणू शकतो.”
दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषकात भारताचा संघ निवडण्यासाठी खेळाडूंचे आयपीएलमधील प्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघा कोणता खेळाडू जागा मिळवतो आणि कोणाला आपली जागा गमवावी लागते, हे पाहण्यासारखे असेल. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सध्या जितेश शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन हे पर्याय संघाकडे आहेत. त्याचसोबत रिषभ पंत देखील फिट झाला आहे आणि भविष्यात टी-20 विश्वचषकात खेळण्याची इच्छा त्याची देखील असणारच. मागच्या वर्षी वनडे विश्वचषक गाजवणाऱ्या केएल राहुल यालाही विचारात घ्यावे लागणार आहे. अशात सॅमसनला संधी कशी मिळते, हे पाहण्यासारखे असेल. (If you do this, Samson will play T20 World Cup! Advice from a former cricketer)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शेन वॉटसनचा नकार, समोर आले मोठे कारण
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम