---Advertisement---

२९८६ खेळाडू आजपर्यंत कसोटी खेळले पण हा कारनामा जमला फक्त कोहलीला

On: शुक्रवार, ऑक्टोबर 11, 2019 5:00 PM
---Advertisement---

पुणे | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने आपला पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषीत केला. विराटने या डावात नाबाद २५४ धावांची शानदार खेळी केली.

विराट कोहलीची ही कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापुर्वी विराटच्या कसोटीतील सर्वोत्तम  धावा २४३ होत्या. दिल्ली कसोटीत २०१७-१८ हंगामात विराटने श्रीलंकेविरुद्ध या धावा केल्या होत्या.

आपल्या कसोटीतील सर्वोत्तम धावांचा वैयक्तिक विक्रम विराटने तब्बल १५वेळा मोडला आहे. विराटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १५ धावा केल्या होत्या.

अशी केली विराटने आपल्या कसोटी डावातील सर्वोत्तम धावांमध्ये सुधारणा- ४, १५, २७, ३०, ५२, ६३, ७५, ११६, ११९, १४१, १६९, २००, २११, २३५, २४३, २५४*

विराटपाठोपाठ कसोटीत वैयक्तिक धावांमध्ये सर्वाधिक वेळा सुधारणा करण्याचा विक्रम मुंबईकर दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे. त्यांनी ११ वेळा ही कामगिरी केली आहे तर कुमार संगकारा, जॅक कॅलिस आणि डेमियन मार्टिनने प्रत्येकी १० वेळा हा कारनामा केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment