वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (16 नोव्हेंबर) दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. कोलकात्याचा ईडन गार्डनवर झालेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत 8 व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू इम्रान ताहीर भावनिक झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी या सामन्यात केवळ 212 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, ऑस्ट्रेलियाने झुंजार खेळ करत तीन गडी राखून विजय मिळवला. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा मागे क्रिकेटपटू इम्रान ताहीर अत्यंत भावनिक झालेला दिसला. प्रसारण वाहिनीशी बोलताना तो म्हणाला,
“मी अत्यंत निराशा आहे. कदाचित या खेळाडूंना हे माहीत नाही की ही कसली संधी होती. तुमचे नाव इतिहासात नोंद झाले असते. यावेळी तुम्ही उपांत्य फेरीचा सामना खेळायला मैदानात उतरता, तेव्हा तुम्ही तुमचे दोनशे टक्के प्रयत्न करायला हवेत. माझ्या अंगावर दक्षिण आफ्रिकेची जर्सी घातल्यावर मी या वयात देखील देशासाठी काहीही करण्यास तयार होईल.”
सामना संपल्यानंतर हे बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा व आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या क्विंटन डी कॉक यांच्यावर त्याने विशेष नाराजी व्यक्त केली.
(Imran Tahir Getting Emotional After South Africa Lost In ODI World Cup Semi Final)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: World Cup Final ला पंतप्रधान मोदी लावणार हजेरी, पाहणार संपूर्ण सामना
विराटचे कौतुक करताना सर विव रिचर्ड्स यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, “तू दुसऱ्या ग्रहावरून…”