दुबई | दक्षिण आफ्रिकेचा अनुभव फिरकीपटूं इम्रान ताहिर आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. त्याने मागील हंगामात सर्वाधिक बळी घेतले होते. परंतु या हंगामात त्याला चेन्नईने एकाही सामन्यात संधी दिलेली नाही. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने मंगळवारी (13 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात तीन फिरकीपटूंना संधी दिली होती. पण त्यामध्येही ताहिरचा समावेश नव्हता.
त्यामुळे तो बऱ्याचदा मैदानात खेळत असेलेल्या आपल्या संघसकाऱ्यांसाठी पाणी घेऊन जाताना दिसला. याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तसेच संघात ताहिरची निवड न केल्याबद्दल चेन्नईवर टीका झाल्या होत्या.
तथापि, ताहिर निराश झाला नाही. मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी घेऊन जाण्यास मला आनंद वाटतो आणि त्याचा मला काहीही फरक पडत नाही, असे त्याने ट्विट करत सांगितले.
ताहिरने ट्विटवर लिहिले आहे की, “जेव्हा मी खेळायचो, तेव्हा बरेच खेळाडू माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन यायचे; आणि आता मैदानात खेळण्यासाठी पात्र असलेल्या खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे. मी संघात खेळत असो किंवा बाहेर बाकावर बसलो असो, माझा संघ विजयी होणे ही माझ्यासाठी महत्वाची बाब आहे. मला संधी मिळेल तेव्हा मी सर्वोत्तम देईल. पण माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.” ताहिरच्या या ट्विटचे कौतुक होत आहे.
When I used to play many players carried drinks for me now when deserved players are in the field it’s my duty do return favors.Its not about me playing or not it’s about my team winning.If I get a chance I will do my best but for me team is important #yellove @ChennaiIPL
— Imran Tahir (@ImranTahirSA) October 14, 2020
ताहीरने आयपीएलच्या मागील हंगामात खेळलेल्या 17 सामन्यात 6.69 च्या इकॉनॉमीने 26 बळी घेतले होते. 12 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय
दया कुछ तो गडबड है! गुगलने शोधला सचिन तेंडुलकरचा ‘जावई’
ट्रेंडिंग लेख –
मराठी मनाचा अभिमान.! नाव ‘तांबे’ पण खेळाडू मात्र सोन्यासारखा
गुळाचे व्यापारी असणाऱ्या कोल्हापूरच्या पाटलाचा मुलगा भारताकडून खेळला अवघा एकच सामना, पण…
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत