आज (6 जानेवारी) भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला गेला. पण या विश्वचषकाबरोबरच कपिल देव यांनी खेळलेला आणखी एक सामना क्रिकेट चाहत्यांच्या नेहमी लक्षात राहिला. तो सामना म्हणजे जुलै 1990 मध्ये लॉर्ड्स मैदानात झालेला कसोटी सामना.
त्या सामन्यात 30 जुलै 1990 रोजी भारताचा विश्वविजेता कर्णधार कपिल देवने इंग्लड विरुद्ध इंग्लंडमध्ये 4 चेंडूत 4 षटकार खेचून भारताला फॉलोऑन पासून वाचवले होते.
इंग्लंडमध्ये झालेल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हा लॉर्ड्स मैदानावर झाला. पहिल्या डावात यजमान इंग्लंड संघाने 162 षटकांत 653 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावात भारताची 9 विकेट्सवर 430 अशी अवस्था होती आणि भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी 24 धावांची गरज होती. मैदानात कपिल देव आणि नरेंद्र हिरवानी ही जोडी होती.
त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला 4 चेंडूत सलग 4 षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच षटकात हिरवानी पहिल्याच चेंडूवर बाद झाले. परंतु, भारताने 1 धावेने इंग्लंड विरुद्ध फॉलोऑन टाळला.
भारत या सामन्यात पुढे 247 धावांनी पराभूत झाला. परंतु कपिल देव यांची ही खेळी आजही चाहते विसरले नाहीत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला तेव्हा नुकतीच सुरुवात झाली होती आणि हा सचिनचा केवळ 8वा सामना होता तर भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता.
🇮🇳 Happy birthday to India's greatest all-rounder, @therealkapildev…
When India needed 24 runs to save follow on with just one wicket left against England at Lord's in 1990, he stepped up to smash 4 sixes in a row! pic.twitter.com/5V8cd8UjLC
— The Sportsman (@TheSportsman) January 6, 2018
त्या सामन्यातील धावफलक:
इंग्लंड:
पहिला डाव: 653/4 घोषित
दुसरा डाव: 272/4 घोषित
भारत:
पहिला डाव: 454 सर्वबाद
दुसरा डाव: 224 सर्वबाद
इंग्लंडने हा सामना 247 धावांनी जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मागील सात वर्षापासून भारत श्रीलंकेविरुद्ध विजय रथावर होता स्वार, पुण्यात घडला विचित्र योगायोग
वाढदिवस विशेष: 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास 10 गोष्टी