---Advertisement---

रोहित कॅप्टन बनताच टीम इंडियात झाले बदल, आता पाकिस्तान येणार गोत्यात?

Rohit-Sharma-Team-India
---Advertisement---

भारताने वेस्ट इंडिज विरुद्धच्या  (WIvsIND) पाचव्या टी२० सामन्यात ८८ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच भारताने ही टी२० मालिका ४-१ अशी जिंकली आहे. फ्लोरिडामध्ये रविवारी (७ ऑगस्ट) खेळला गेलेला हा सामना भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा धावांच्या फरकाने सर्वात मोठा विजय ठरला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एक वेगळाच संघ ठरत आहे. तसेच संघाला मोठा विक्रम रचण्याचीही संधी आहे.

शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली होती. भारताने या सामन्यात २० षटकात ७ विकेट्स गमावत १८८ धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने १५.४ षटकात १०० धावा केल्या. यावेळी भारतीय फिरकीपटूंची कामगिरी विशेष ठरली आहे. अक्षर पटेल याने ३ आणि लेग स्पिनर रवि बिश्नोई याने ४ विकेट्स घेतले आहेत.

भारतीय संघाने २०२२मध्ये आतापर्यंत २१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तर त्यातील १६ सामने जिंकले आहे. यामुळे भारताचे या वर्षातील सर्वोत्तम टी२०तील कामगिरी ठरली आहे. एवढेच नाही तर भारताने पहिल्यांदाच एका वर्षात सर्वाधिक सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे. याआधी भारताने २०१६मध्ये १५ सामने जिंकले होते.

भारतीय संघ आता एशिया कपमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. ही स्पर्धा टी२०च्या स्वरूपाची असल्याने लवकरच भारतीय संघ जाहीर झाला आहे. या स्पर्धेत भारत अंतिम सामन्याआधी ५ सामने खेळणार आहे. तर दोन वेळा पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. यामुळे भारताकडे एका वर्षात सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम करण्याची संधी आहे.

एका वर्षात सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विक्रम सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर आहे. पाकिस्तानने २०२१मध्ये २९ पैकी २० सामने जिंकले आहेत. भारतीय संघ एशिया कपनंतर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध घरच्या मैदानावर एकूण ६ टी२० सामने खेळणार आहेत. त्यातच ऑक्टोबर महिन्यात टी२० विश्वचषक खेळला जाणार आहे. एवढ्या सगळ्या संधी असताना भारत पाकिस्तानचा एकाच वर्षात सर्वाधिक टी२० सामने जिंकण्याचा विक्रम मोडणार हे जवळपास निश्चित आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

BIG BREAKING: आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित कर्णधार, ‘ही’ अनपेक्षित नावेही सामील

भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना

VIDEO: राधा यादवच्या फिल्डींगची आयसीसीही झाली फॅन; चलाखीने केलेल्या रनआऊटचा व्हिडिओ केला शेअर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---