मेलबर्न। भारताने आज (३० डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ८६ धावांत ९ विकेट्स घेत विजयात मोलाची भूमीका निभावली आहे. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला आहे.
भारताने यावर्षी परदेशात खेळताना ११ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवले आहेत. हे विजय भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिळवले आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत, तर इंग्लंड विरुद्ध नॉटिंगघम कसोटीत विजय मिळवला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड आणि आज मेलबर्न कसोटीत विजय मिळवला आहे.
विषेश म्हणजे या चारही कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स जसप्रीत बुमराहने घेतल्या आहेत. त्याने जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १११ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने इंग्लंड विरुद्धच्या नॉटिंगघम कसोटीत १२२ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ११५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात तो आर अश्विनसह भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. अश्विननेही या सामन्यात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
बुमराहने याच वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये कसोटी पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत कसोटीत ९ सामन्यात २१.०२ च्या सरासरीने ४८ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच बुमराह २०१८ मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० सामन्यात ३९ डावात ७८ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच
–विकेट्स घेतल्या बुमरहाने, धावा केल्या पुजाराने, विक्रम झाला इशांतच्या नावावर
–पंत फक्त बडबड करत नाही तर हा मोठा इतिहासही घडवतो