---Advertisement---

‘खरा मित्र सुखासोबतच दुःखातही…’, सिडनीतील सभेत नरेंद्र मोदींनी काढली शेन वॉर्नची आठवण

On: मंगळवार, मे 23, 2023 10:44 PM
Narendra Modi Shane Warne
---Advertisement---

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. मोदींनी मंगळवारी (23 मे) ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये सभा घेतली. ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी मोदीची ही सभा होती, असे सांगितले गेले. एरिना स्टेडियममध्ये झालेल्या या सभेत मोदी दोन देशांमधील क्रिकेट संबंधांवर देखील बोलले. यावेळी दिवंगत शेन वॉर्न यांचीही आठवण मोदींनी काठली.

मागच्या वर्षी मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) काळाच्या पडद्याआड घेला. वॉर्न थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता आणि त्याचठिकाणी ह्रदयविकाराच्या झटक्यात त्याचे निधन झाले. 4 मार्च 2022 रोजी झालेल्या या घटनेनंतर भारतातील क्रिकेटप्रमी देखील चांगलेच निराश होते. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अगदी हीच बाब सिडनीतील आपल्या सभेत बोलून दाखवली. मोदींच्या मते वॉर्नच्या निधनानंतर कोट्यावधी भारतीय आपल्यातील कोणातरी वजळच्या व्यक्तिचे निधन झाल्याप्रमाणे दुःखात होते.

मोदी आपल्या सभेत म्हणाले, “ऑस्ट्रेलियासोबत आमचे संबंध फक्त सुखाच्या काळात साथ देणारे नाहीत. चांगला मित्र सुखात सोबत असतोच, पण दुःखाच्या काळातही तो नेहमी आपल्या सोबत असतो. मागच्या वर्षी शेन वॉर्नचे निधन झाल्यानंतर ऑस्ट्रेलियासोबतच कोट्यावधी भारतीय शोक व्यक्त करत होते. अगदी आपल्यातील कोणाचेतरी निधन झाल्याप्रमाणे तो काळ होता.” वॉर्न आणि भारताचे नाते तसे पाहता आधी खेळाडू आणि नंतर समालोचक म्हणून नेहमीच चर्चेत राहिले. क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न मुकाबला पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असायचे.

शेन वॉर्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज राहिला आहे. त्याच्या नावावर एकूण 1001 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. एकंदरीत पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेटधील वॉर्नर दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला आहे. यादीत यादीत पहिल्या क्रमांकावर श्रीलंकन दिग्गज मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने 1347 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे, ज्याने 972 विकेट्स घेतल्या आहेत. येत्या काळात अँडरसनला वॉर्नचा विक्रम मोडण्यासाठी दावेदार मानले जात आहे. (In his speech in Sydney, Narendra Modi remembered Shane Warne)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING: वेस्ट इंडिजचा बडा क्रिकेटपटू फिक्सिंग प्रकरणात निलंबित, क्रिकेटविश्वात खळबळ
एक-दोन नाही हंगामातील 10 सामन्यात धोनीने दाखवलं धाडस, गुजरातविरुद्ध उतरवली आपली खास प्लेइंग इलेव्हन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---