ईशान किशन शनिवारी (7 जानेवारी) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात एक धाव करून बाद झाला. ईशान किशन आणि शुबमन गिल या सामन्यात भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पण सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर ईशानने विकेट गमावली. आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीच्या सुरुवातील संघासाठी अप्रतिम खेळ दाखवणारा ईशान मागच्या मोठ्या काळापासून या फॉरमॅटमध्ये अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाते.
ईशान किशन (Ishan Kishan) याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने आतापर्यंत 23 सामने (शनिवार पूर्वी) खेळले आहेत. या सामन्यांमध्ये ईशानच्या नावावर एकूण 628 धावांची नोंद आहे. 4 अर्धशतकांच्या जोरावर त्याने या धावा केल्या आहेत. शनिवारी त्याचे कारकिर्दीतील 24 वा टी-20 सामना खेळला. आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिल्या 13 डावांच्या तुलनेत शेवटच्या 11 डावांमध्ये इशानचे प्रदर्शन खूपच सुमार पाहायला मिळाले. बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यात काही दिवसांपूर्वी ईशानने द्विशतक केले, पण टी-20 मात्र त्याला असे प्रदर्शन करता आले नाहीये.
https://twitter.com/BrokenCricket/status/1611718713908264961
टी-20 कारकिर्दीतील पहिल्या 13 डावांमध्ये इशानने 37.75 च्या सरासरीने धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट 132.45 होता. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. शेवटच्या 11 डावांचा विचार केला, तर ईशानने यामध्ये अवघ्या 16 च्या सरासरीने आणि 117.33 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. मागच्या 11 डावांमध्ये ईशानला अवघ्या 176 धावा करता आल्या आहेत. मागच्या 11 डावांमध्ये ईशानची सर्वात मोठी खेळी 37 धावांची राहिली आहे. त्याच्या एकंतरीत टी-20 कारकिर्दीचा विचार केला, तर 89 धावा ही त्याची सर्वात मोठी खेली आहे.
https://twitter.com/Cric_beat/status/1611718555397152768
श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करत असून नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर ईशान किशन एक धावा करून दिलशान मधूशंका याच्या चेंडूवर विकेट गमावली. भारताला दुसरा धक्का बसला तो राहुल त्रिपाठी याच्या रूपात. राहुलचा हा कारकिर्दीतील दुसरा टी-20 सामना असून त्याने 16 चेंडूत 35 धावांची दमदार खेळी केली. यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. राहुलने विकेट गमावली तेव्हा भारताची धावसंख्या 5.5 षटकात दोन बाद 52 धावा होती. (In T20 international cricket, Ishan Kishan has managed to score just 16 runs in his last 11 innings.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या टी20 मध्ये नाणेफेकीचा कौल हार्दिकच्या बाजूने! घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय
हार्दिकच्या नेतृत्वाबाबत गुजरात टायटन्सच्या फिनिशरचे मोठे विधान; म्हणाला, “त्याच्यात ते गुण…”






