---Advertisement---

2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत बुमराह टॉप-10 बाहेर! सिराजचा क्रमांक कोणता?

On: रविवार, ऑगस्ट 10, 2025 8:28 PM
---Advertisement---

2025 अर्धं वर्ष उलटलंय, पण अजूनपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने 50 तर दूरच, 40 विकेटसुद्धा घेतलेल्या नाहीत. गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 71 विकेट घेतल्या होत्या. पण 2025 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ऑस्ट्रेलिया, भारत किंवा न्यूझीलंडचा नसून झिम्बाब्वेचा आहे आणि जसप्रीत बुमराह या यादीत टॉप-10 मध्येही नाही.

2025 मध्ये सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा गोलंदाज झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजरबानी आहे. त्याने आतापर्यंत 9 सामन्यांत 36 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क असून त्याच्या खात्यात 29 विकेट आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा मोहम्मद सिराज असून त्याने 6 सामन्यांत 26 विकेट घेतल्या आहेत. यापैकी 23 विकेट सिराजने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत घेतल्या.

2025 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटू ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन आहे. त्याने 6 सामन्यांत 24 विकेट घेतल्या आहेत. तर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमार जोसेफ 22 विकेटसह पाचव्या स्थानावर आहे.

टॉप-5 गोलंदाज 2025 (कसोटी क्रिकेट)

ब्लेसिंग मुजरबानी – 36 विकेट

मिचेल स्टार्क – 29 विकेट

मोहम्मद सिराज – 27 विकेट

नाथन लायन – 24 विकेट

शमार जोसेफ – 22 विकेट

जगातील क्रमांक 1 कसोटी गोलंदाज जसप्रीत बुमराह सर्वाधिक विकेटच्या यादीत टॉप-5 मध्ये तर नाहीच, पण टॉप-10 मध्येही नाही. त्याने 2025 मध्ये आतापर्यंत 4 कसोटी सामन्यांत फक्त 16 विकेट घेतल्या आहेत आणि तो सध्या 13व्या क्रमांकावर आहे. टॉप-10 मध्ये मोहम्मद सिराजशिवाय (mohmmed Siraj) दुसरा एकही भारतीय गोलंदाज नाही. सिराजनंतर भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा असून त्याच्या खात्यात 20 विकेट आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---