जेव्हा एखादा क्रिकेटपटू आपल्या कारकीर्दीची सुरूवात करतो तेव्हा तो मोठ्या आणि यशस्वी कारकिर्दीची स्वप्ने पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर प्रत्येक क्रिकेटपटू हा आपल्या देशाच्या संघासाठी मोठी कारकीर्द बनवण्याचा प्रयत्न करतो आणि कारकीर्द यशस्वी करून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.
असे असंख्य खेळाडू आहेत ज्यांनी अभूतपूर्व कारकीर्द घडवली आहे. २० व्या शतकाबद्दल बोलतांना, आतापर्यंत असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी जबरदस्त सुरुवात केली आणि ते आगामी काळात एक चांगली आणि यशस्वी कारकीर्द तयार करणार असल्याचे दिसून आले होते. पण त्यांची कारकिर्द अचानक संपली.
या लेखातही २० व्या शतकातील काही क्रिकेटपटूंबद्दल आढावा घेतला आहे, जे प्रतिभावान होते, त्यांनी मोठी यशस्वी कारकिर्द घडवली असती, परंतु ज्यांची कारकीर्द काही कारणास्तव अचानक संपली.
१. फिल ह्यूजेस (Phil Hughes)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजेस कोण नाही ओळखत? पदार्पणानंतर फिल ह्यूजेस ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी आपली कारकीर्द वेगाने यशस्वीपणे पुढे नेत होता. परंतु केवळ त्याची कारकिर्दच नव्हे, तर त्याच आयुष्यही २०१४ मध्ये कायमच संपलं.
ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शील्ड स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाज काइल अॅबॉटचा एक चेंडू डोक्याला लागला. यानंतर, फिल ह्यूजेस काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल होता आणि उपचार चालू असतानाच वयाच्या २६ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला आणि एका प्रतिभावान खेळाडूची कारकीर्द कायमची संपली.
२. क्रेग कीस्वेटर (Craig Kieswetter)
इंग्लंड क्रिकेट संघाने २०१० मध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा आपल्या नावावर केली. या टी-२० विश्वचषकात यष्टीरक्षक फलंदाज क्रेग कीस्वेटरने इंग्लंडसाठी मोठे योगदान दिले. क्रेग कीस्वेटरने आपल्या फलंदाजीने वेगळी छाप पाडली पण २०१५ मध्ये देशांतर्गत टी-२० स्पर्धेदरम्यान क्रेग कीस्वेटरच्या डोळ्याला एक चेंडू लागला. यानंतर, कीस्वेटरची नजर कमकुवत होऊ लागली. त्यामुळे त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. असा पद्धतीने या चांगल्या खेळाडूची कारकीर्द कायमची थांबली.
३. आकीब जावेद ( Akeeb Javed)
पाकिस्तान क्रिकेट संघाकडे वेगवान गोलंदाजांची कमतरता नाही. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक होते अकीब जावेद. त्यांनी सर्वात कमी वयात वनडे क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. आकीब जावेदकडे जबरदस्त प्रतिभा होती. अकीब जावेदने पाकिस्तानकडून १९९२ चा विश्वचषकही खेळला. पण वयाच्या २६ व्या वर्षी फिक्सिंगच्या प्रकरणामुळे आकिब जावेदची कारकीर्द संपली.
४. बासित अली (Basit Ali)
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात अनेक महान खेळाडू होऊन गेले. पाकिस्तान संघात बासित अली यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. बासित अली पाकिस्तानसाठी ज्या प्रकारे खेळले, त्या प्रकारे त्यांची तुलना जावेद मियाँदादशी केली गेली.
त्यांनी पाकिस्तानकडून १९ कसोटी आणि ५० वनडे सामने खेळले होते. परंतु त्यांनी आपल्याच संघातील काही वरिष्ठ खेळाडू सामना फिक्सिंगमध्ये असल्याचे म्हटले. मग त्यानंतर त्यांना संघात कधीही संधी मिळाली नाही आणि १९९६ मध्ये त्यांची कारकीर्द संपली.
५. जेम्स टेलर (James Taylor)
इंग्लंड क्रिकेट संघाला गेल्या काही वर्षांत काही प्रतिभावान खेळाडू मिळाले. या खेळाडूंमध्ये इंग्लंडचा फलंदाज जेम्स टेलरचे देखील नाव होते. जेम्स टेलर ज्याप्रकारे इंग्लंडकडून खेळत होता, तर तो लवकरच कारकिर्दीचे शिखर गाठू शकत होता, परंतु अचानक त्याचा एक आजार उघडकीस आला. वयाच्या केवळ २६ व्या वर्षी हृदयाच्या आजारामुळे कारकीर्दीतून निवृत्ती घेतली. त्याने ७ कसोटी आणि २७ वनडे सामने खेळले.
६. इरफान पठाण (Irfan Pathan)
२००३ मध्ये एका प्रतिभावान खेळाडूने भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केल. ज्याची तुलना कपिल देव सारख्या दिग्गजाशी केली गेली होती. तो खेळाडू म्हणजे भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण. या खेळाडूने फक्त वेगवान गोलंदाजी करत गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही भारतासाठी उत्तम कामगिरी केली.
इरफान पठाणची कारकीर्द खूप मोठी होऊ शकली असती, पण वयाच्या २८ व्या वर्षानंतर त्याला पुन्हा संघात संधी देण्यात आली नाही.
७. मोहम्मद कैफ (Mohammed Kaif)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने भारतीय संघाला प्रभावी योगदान दिले आहे. मोहम्मद कैफची प्रथम श्रेणी कारकीर्द खूपच जबरदस्त राहिली. तर त्याने वनडे आणि कसोटी सामन्यांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले. कैफ विशेषत: आपल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जात होता. कैफ एक उत्तम क्षेत्ररक्षक होता, परंतु वयाच्या २६ व्या वर्षी कैफला संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर तो परत कधीही संघात दिसला नाही. मग त्याने आपली कारकीर्द जुलै २०१८ ला संपवली.
८. तातेंदा तैबू (Tatenda Taibu)
झिम्बाब्वे क्रिकेट संघातही काही उत्तम खेळाडू होते. काही वर्षापूर्वी यष्टीरक्षक फलंदाज तातेंदा तैबू झिम्बाब्वे संघात होता. झिम्बाब्वे संघात स्थान मिळवल्यानंतर काही वर्षांत तातेंदा तैबूही कर्णधार झाला.
तो संघासाठी चांगली कामगिरी करीत होता आणि त्याची जागा सुरक्षित होती, परंतु त्यानंतर त्याने आपल्या संघाबद्दल काही वादग्रस्त विधान केले. त्यानंतर त्याची संघातील जागा कमी करण्यात आली आणि शेवटी त्याची कारकीर्द संपुष्टात आली.
९. मोहम्मद असिफ (Mohammad Asif)
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात मोहम्मद असिफ हा एक उत्कृष्ट आणि स्विंग गोलंदाज होता. २००० च्या दशकात मोहम्मद असिफला पाकिस्तान संघात स्थान देण्यात आले होते. मोहम्मद असिफने अतिशय चमकदार कामगिरी केली आणि संघात त्याने आपले स्थान पक्के केले.
संघाचा खास खेळाडू असलेल्या असिफने २०१० मध्ये स्पॉट फिक्सिंगची चूक केली. यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घातली गेली आणि तो परत कधीही मैदानात परतला नाही.