यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघाची आशिया चषकातील कामगिरी आजपर्यत अप्रतिमि राहिली आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने २०१८ साली खेळल्या गेलेल्या आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी भारतीय संघात असे काही खेळाडू होते, ज्यांनी अप्रतिम प्रदर्शन केले. परंतु, आता हे दिग्गज खेळाडू पुन्हा संघात दिसतीलच, याची कसलीही खात्री देता येणार नाही. या चार खेळाडूंपैकी एकाणे निवृत्ती घेतली आहे. चला तर या चौघांविषयी जाणून घेऊया.
१. शिखर धवन –
भारताचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज शिखऱ धवन (Shikhar Dhawan) २०१८ साली आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करत होता. त्यावेळी भारताला विजय मिळवून देण्यासाठी धवनची धमाकेदार फलंदाजी अनेकदा कामी आली. संपूर्ण हंगामात त्याने ३४२ धावा ठोकल्या आणि मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. असे असले तरी, धवन मागच्या मोठ्या काळापासून संघात स्वतःचे नियमित स्थान बनवू शकला नाहीये. अलिकडच्या काही मालिकांमध्ये त्याला संघात संधी मिळाली असली, तरी आगामी काळात त्याला संधी मिळण्याची खूप कमी शक्यता आहे. धवन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी त्याला संघातून वारंवार बाहेर ठेवले जात आहे.
२. केदार जाधव –
२०१८ साली केदार जाधव (Kedar Jadhav) भारतीय संघाचा मध्यक्रमातील महत्वाचा फलंदाज होता. त्याने स्वतःच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकवून दिले. मधल्या षटकांमध्ये जेव्हा कधी कर्णधाराला विकेटची गरज असेल, तेव्हा केदार जाधवने उत्कृष्ट गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या. जाधवने भारतासाठी त्याचा शेवटचा टी-२० सामना २०१७ साली खेळला होता. २०१८ सालचा आशिया चषक ५० एकदिवसीय प्रकारातील असून केदार जाधवने भारतासाठी महत्वापूर्ण प्रदर्शन केले होते. मात्र, यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकात तो संघात नसेल.
३. एमएस धोनी –
भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्याने मागच्या आशिया चषकात संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडली होती. धोनी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक राहिला आहे. त्याने २०१८ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात बांग्लादेशविरुद्ध ३६ धावांची महत्वपूर्ण खेळी होती, जो संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाची ठरली. यावर्षीच्या आशिया चषकात धोनीची कमरताना संघाला नक्कीच जाणवेल.
४. अंबाती रायडू –
अनुभवी फलंदाज अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने आशिया चषका २०१८ मध्ये भारतासाठी मध्यक्रातील फलंदाजाच्या रूपात उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. परंतु, नंतर खराब प्रदर्शनामुळे त्याला संघातून वगळले गेले. २०१६ नंतर त्याने भारतासाठी एकही टी-२० सामना खेळला नाही. अशात भारताच्या टी-२० संघाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. आगामी आशिया चषकातही मध्यक्रमातील फलंदाजाची भूमिका महत्वाची राहणार आहे, जी एकेकाळी रायडू चोखपणे पार पाडत होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रेणुकाच्या अफलातून गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या गुल! एकाच व्हिडिओमध्ये पाहा विकेट्सचा थरार
तुलिका मानने ज्यूडोमध्ये भारताला मिळवून दिले सिल्वर मेडल, वाचा तिचा कॉमनवेल्थमधील प्रवास
WIvsIND: रोहित-द्रविडच्या डोळ्यात खुपतोयं ‘हा’ खेळाडू, बनला आहे टीम इंडियाची मोठी कमजोरी