पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रशीद लतीफने अफगाणिस्तान क्रिकेट संघाबाबत एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे त्यामुळे रशीद लतीफ खूप खूश असून येत्या पाच वर्षांत अफगाणिस्तानमधून जागतिक दर्जाची प्रतिभा उदयास येऊ शकते, असे सांगितले आहे.
विश्वचषक 2023 च्या 30 व्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 7 विकेट्स राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 49.3 षटकांत 241 धावा करून सर्वबाद झाला. अफगाणिस्तानने 45.2 षटकांत केवळ 3 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर फलंदाजीत रहमत शाह, कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी अर्धशतके झळकावली.
या विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे. उर्वरित तीन सामने जिंकल्यास ते उपांत्य फेरीत जाऊ शकतात. या संघाने आतापर्यंत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना पराभूत केले आहे आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढलेलाही दिसत आहे.
रशीद लतीफ (Rashid Latif) याच्या मते अफगाणिस्तान एक संघ म्हणून खेळला आहे आणि त्यामुळेच ते इतके यशस्वी झाले आहेत. ट्वीटरवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, “विश्वचषकात अफगाणिस्तानचे यश हे दाखवते की, सांघिक एकता जागतिक मंचावर काय करू शकते हे दिसून येते. त्यांच्या कामगिरीमुळे अफगाणिस्तानातील तरुणांना खूप प्रेरणा मिळेल. येत्या पाच वर्षांत अफगाणिस्तानातून जागतिक दर्जाची प्रतिभा उदयास आली तर नवल वाटायला नको.”
Afghanistan's success in this ICC World Cup shows what team unity can achieve at the global stage. This performance is bound to inspire a generation back in Afghanistan. Don't be surprise if you see world-class talent coming from Afghanistan in the next five years… pic.twitter.com/Hxa5TEVnvH
— Rashid Latif | 🇵🇰 (@iRashidLatif68) October 30, 2023
उपांत्य फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला पुढील तीनपैकी तीन सामने जिंकावे लागतील. याशिवाय त्यांना न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यातील कोणताही एक संघ एक सामना हरण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना नेट रन रेटही चांगला ठेवावा लागेल. जेणेकरून त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी फायदा होईल. (In the next five years Pakistani cricketer shocking prediction about Afghanistan team)
म्हत्वाच्या बातम्या
‘सब्र का फल…’, मोहम्मद शमीने चाहत्याच्या पोस्टला दिले अप्रतिम कॅप्शन