भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरमध्ये खेळला जाईल. शनिवारी (१२ मार्च) हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुपारी दोन वाजता सुरू होईल. उभय संघातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये भारताने एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामना विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. उभय संघातील हा दुसरा सामना दिवस-रात्र स्वरूपात खेळला जाईल, ज्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर होईल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेला यापूर्वीचे कसोटी सामने
एकूण सामने ४५
भारत विजयी – २१ सामने
श्रीलंका विजयी – ७ सामने
अनिर्णीत – १७ सामने
पिच रिपोर्ट
बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. स्विंग गोलंदाजांनाही सामन्याच्या सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते. त्यानंतर फिरकी गोलंदाज स्वतःचे जाळे पसरवू शकतात.
हवामान
सामन्यादरम्यान वातावरण ४५ % आद्रता आणि हवा १८ किमीच्या ताशी वेगाने वाहिल. तसेच तापमान २२ ते २७ डिग्री सेल्सियसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सामन्यात पाऊस येण्याची कसलीही शक्यता नाही.
सामन्याशी निगडीत इतर काही महत्वाचे मुद्दे
दरम्यान, यापूर्वी श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने गुलाबी चेंडूच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये १९.१३ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत. तर विराट कोहलीचे शेवटचे शतक हे गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यातच पाहायला मिळाले होते. विराटने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यात हे शतक केले होते.
यापूर्वी भारतीय संघाने खेळलेल्या गुलाबी चेंडूच्या पहिल्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजांना एकही यश मिळाले नव्हते. परंतु, गुलाबी चेंडूच्या दुसऱ्या सामन्यात अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन आणि वाशिंगटन सुंदर या तिघांच्या फिरकीपुढे विरोधी संघाने २० पैकी १९ विकेट्स गमावल्या होत्या. शनिवारी सुरू होणाऱ्या सामन्यात या सर्व खेळाडूंच्या प्रदर्शनावर लक्ष असेल.
संभावित प्लेइंग इलेव्हन
भारत :
रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल / जयंत यादव / मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
श्रीलंका :
लाहिरु थिरिमाने, दिमुथ करुणारत्ने (कप्तान), कुसल मेंडिस, एंजेलो मैथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुलडेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा
महत्वाच्या बतम्या –
कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले
आयएसएल: शील्ड विजेत्या जमशेदपूरला केरलाने रोखले; समदचा एकमेव गोल निर्णायक