भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा कसोटी संघाची घोषणाी झाली आहे, पण माजी कर्णधार केन विल्यमसन बेंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही. तो भारत दौऱ्यावर येईल, कारण त्याच्या मांडीला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने आज बुधवारी (9 ऑक्टोबर) खुलासा केला की, विल्यमसनला श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती आणि भारतात संघात सामील होण्यापूर्वी त्याचे रिहॅबीटेशन केले जाईल.
न्यूझीलंड संघाचे निवड सामितीमधील एका आधिकाऱ्याने आशा व्यक्त केली की, विल्यमसन त्याचे पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर मालिकेत खेळण्यासाठी उपलब्ध होईल. वेल्स यांनी स्पष्ट केले, “आम्हाला मिळालेला सल्ला असा आहे की केनसाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे आराम करणे आणि दुखापत वाढवण्याचा धोका पत्करण्याऐवजी पुनर्वसन करणे. आम्हाला आशा आहे की पुनर्वसन योजनेनुसार झाले तर केन विल्यमसन दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. दौऱ्याच्या सुरुवातीपासून विल्यमसन उपलब्ध नसणे हे निश्चितच निराशाजनक आहे, परंतु त्यामुळे दुसऱ्या खेळाडूला महत्त्वाच्या मालिकेत भूमिका बजावण्याची संधी मिळेल.”
New Zealand’s Squad for the Test series vs India:
Latham (C), Williamson, Blundell, Bracewell, Chapman, Conway, Henry, Daryl Mitchell, Ajaz, O’Rourke, Phillips, Rachin, Santner, Sears, Sodhi, Southee, Young.
– Kane Williamson is doubtful for the first Test, Chapman as Cover. pic.twitter.com/sOtAW5hwG2
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 9, 2024
सध्या कसोटी क्रिकेटमध्ये अनकॅप्ड असलेल्या मार्क चॅपमनचा विल्यमसनसाठी कव्हर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंडच्या पांढऱ्या चेंडू संघांमध्ये नियमितपणे खेळणाऱ्या चॅपमनची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा शतकांसह सरासरी 41.9 आहे. त्याने 2020 मध्ये भारत अ विरुद्ध शतकही ठोकले आहे. वेल्स म्हणाले, “आमचा विश्वास आहे की मार्क चॅपमन आमचा एक सर्वोत्तम फिरकीपटू आहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. याशिवाय, मायकेल ब्रेसवेल पहिल्या कसोटीसाठी संघासोबत असेल.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साऊदी, केन विल्यमसन (पहिल्या कसोटीसाठी अद्याप उपलब्ध नाही) आणि विल यंग
हेही वाचा-
ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय, न्यूझीलंडचा दारुण पराभव; भारताला फायदा?
“2 कोटींमध्ये काय…”, ऑलिम्पिक पदक विजेत्याच्या वडिलांची मागणी म्हणाले, एक फ्लॅट…
शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने रचला इतिहास! मुल्तानमध्ये केली मोठी कामगिरी